आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ndian Diplomat Devyani Khobragade Gets Accreditation To India's Permanent Mission To UN.

देवयानी खोब्रागडेंना संयुक्त राष्‍ट्रसंघाकडून विशेषाधिकार बहाल, तात्पुरता दिलासा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्‍टन- अमेरिकेतील राजनैतिक अधिकारी डॉ. देवयानी खोब्रागडे यांना संयुक्त राष्‍ट्रसंघाने राजनैतिक विशेषाधिकार बहाल केले आहेत. यामुळे खोब्रागडे यांना दिलासा मिळाला आहे. अर्थात त्‍यांच्‍याविरुद्ध व्‍हीसा फसवणूकप्रकरणी खटला सुरुच राहणार असून त्‍यांना प्रत्‍यक्ष न्‍यायालयात हजर राहण्‍यापासून सूट मिळाली आहे. देवयानी यांना अटक करण्‍यात आली होती. त्‍यानंतर त्‍यांची बदली संयुक्त राष्‍ट्रसंघाच्‍या कार्यालयात करण्‍यात आली होती. त्‍यांना राजनैतिक अधिकार बहाल करण्‍यात यावे, यासाठी भारताने प्रक्रीयाही सुरु केली होती.

देवयानी खोब्रागडे यांच्‍याविरुद्ध संगीता रिचर्ड या मोलकरणीने पिळवणूक आणि कमी पगार दिल्‍याचा आरोप करुन तक्रार दाखल केली होती. त्‍यानंतर देवयानी यांच्‍याविरुद्ध गुन्‍हे दाखल करुन 12 डिसेंबरला अटकही करण्‍यात आली होती. अटकेत असताना खोब्रागडे यांची अगझडती करण्‍यात आली होती. त्‍यावरुन रोष व्‍यक्त करण्‍यात येत आहे. याप्रकरणी खोब्रागडे यांच्‍यावरील आरोप रद्द करण्‍यात यावे यासाठी अमेरिकेतील एका गटाने व्‍हाइट हाऊसमध्‍ये ऑनलाईन याचिका दाखल केली आहे.

काय म्‍हटले आहे याचिकेत... वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये...