आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nearly 290 People Missing In South Korea Ferry Disaster

\'आई मी कदाचित जिवंत वाचू शकणार नाही\'; बुडणार्‍या जहाजातून विद्यार्थ्यांनी पाठवले भावूक मेसेज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोकपो- दक्षिण कोरियामध्ये जहाज बुडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या नऊ झाली आहे. दक्षिण किनार्‍यावर बुधवारी (16 एप्रिल) सकाळी एक विशाल जहाजाला जलसमाधी मिळाली. 160 प्रवाशांना वाचविण्यात यश आले असले तरी 290 प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या जहाजमध्ये 325 शाळकरी मुलांसह एकूण 474 प्रवासी होते. पश्चिम इंचियोन येथून जहाज रवाना झाले होता. ब्यूंगपूंग द्वीपपासून 20 किलोमीटर अंतरावर जहाज बुडाले.
'सीबीसी न्यूज'च्या एका अहवालानुसार, डानवोन हायस्कूलच्या एका विद्यार्थ्याने पालकांना पाठवलेला मेसेज अत्यंत भावूक करणारा आहे. हा मेसेज प्रकाशित करण्‍यात आला आहे. 'आई, मी आपल्याला हा मेसेज यासाठी पाठवत आहे कारण मी कदाचित जिवंत वाचू शकत नाही. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो", विशेष म्हणजे हा मेसेज पाठवणार्‍या मुलाला वाचविण्यात यश आले आहे.
"आता आम्ही सगळे मरणार आहे. मी जर तुमच्याशी चुकीचे वागलो असेल तर मला माफ करा. मी तुम्हा सगळ्यावर खूप प्रेम करतो', असा मेसेज एका अन्य विद्यार्थ्याने थिएटर क्लबच्या सदस्यांना पाठवला आहे. मात्र, मेसेज पाठवणारा विद्यार्थी अद्याप बेपत्ता आहे.

जहाज बुडण्याआधी मोठा आवाज झाला. त्यानंतर जहाज वाकडे होण्यास सुरुवात झाली, अशी महिती दुर्घटनाग्रस्त जहाजातून सुखरुप बचावलेल्या प्रवाशांनी दिली. कोस्ट गार्ड अधिकारी कॅप्टन आणि क्रू मेंबर्सची कसून चौकशी घेत आहेत.
दरम्यान, 900 प्रवाशांची क्षमता असलेले हे जहाज 480 फुट लांब होते. मंगळवारी (15एप्रिल) उत्तर कोरियाच्या इंचियोन बंदराहून पर्यटन द्वीप जेजूकडे रवाना झाले होते. जहाजाने 14 तासांचा प्रवास केला होता. मात्र, वाटेतच जहाजाला जलसमाधी मिळाली..
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, कशी झाली दुर्घटना.