आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नग्न फोटोसेशन; इराणच्या अभिनेत्रीला मायदेशात बंदी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - एका फ्रेंच मासिकासाठी नग्न फोटोसेशन करणारी अभिनेत्री गोल्शीफटेह फारहानी हिला चांगल्याच रोषाला सामोरे जावे लागत आहे. तिला आता मायदेशी परतण्यास बंदी करण्यात आली आहे. सध्या ती फ्रान्समध्ये राहत आहे.
‘बॉडी ऑफ लव्ह’ फेम फारहानी (28) हिने फ्रान्सच्या नियतकालिकासाठी ब्लॅक अ‍ॅँड व्हाइट फोटोसेशन केले आहे. तिचे पहिले छायाचित्र मादाम ले फिगारो या मासिकातून प्रकाशित झाले. त्यानंतर इराणमधील मूलतत्त्ववादी भडकले. त्यांच्याकडून आलेल्या दबावानंतर इराण सरकारने फरहानी हिच्याशी संपर्क साधला. तू जे काही केले आहे. त्यामुळे मायदेशी येण्याचा विचार सोडून दे असा सल्ला इराणच्या सरकारने तिला दिला आहे. फारहानीने
फेसबुकवर तिचे फोटो पोस्ट केले. धर्माच्या नावाखाली असलेल्या देशात बंधनावर या माध्यमातून निषेध व्यक्त करत असल्याचे तिने स्पष्ट केले.