आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nelson Mandel Keep Aside From Ventiletor Advise Doctors

नेल्सन मंडेला यांचे ‘व्हेंटिलेटर’ काढण्याचा डॉक्टरांचा सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांना लावण्यात आलेली जीवरक्षक प्रणाली काढण्यात यावी, असा सल्ला त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी मंडेला कुटुंबियांना दिला आहे.


मंडेला यांना कायम जीवनरक्षा प्रणालीची गरज भासू लागली आहे. त्यामुळे ही व्यवस्था बंद करण्यात यायला हवी, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. त्यांना या प्रणालीमुळे त्रास होत आहे. याचा अगदी वास्तववादी विचार झाला पाहिजे, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. मंडेला यांच्या प्रकृतीबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांचे नातेवाईक, अधिकारी उपलब्ध झाले नाहीत.


मुलांचे अवशेष मूळ गावी !
मंडेला यांचे प्राण ज्या गोष्टीमुळे अडकल्याची चर्चा होती. त्यामागे त्यांच्या तीन मृत मुलांचे कारण सांगितले जाते. त्यांचे मृतदेहाचे अवशेष मुझू प्रांतात दफन करण्यात आले होते. ते गुरूवारी पुन्हा मंडेला यांच्या कुनू प्रांतातील मूळ गावी दफन करण्यात आले. बुधवारी केप उच्च् न्यायालयाने या विधीसाठी परवानगी दिली होती.