आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेल्‍सन मंडेला यांची प्रकृती चिंताजनक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिटोरिया- दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्‍ट्रपती नेल्सन मंडेला यांची प्रकृती अतिशय गंभीर झाली आहे. मंडेला यांना दोन आठवड्यांपूर्वी रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले होते. त्‍यांच्‍या फुफ्फुसात जंतूसंसर्ग झाला होता. दोन दिवसांपूर्वीच त्‍यांची प्रकृती स्थिर असल्‍याचे सांगण्‍यात आले होते. परंतु, काल रात्री प्रकृती ढासळली.

दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा व सत्ताधारी आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेस पक्षाचे नेते सिरील रामाफोसा यांनी काल सायंकाळी प्रिटोरिया येथील रुग्‍णालयात मंडेला यांची भेट घेतली होती. त्‍यांना डॉक्‍टरांनी मंडेलांच्‍या प्रकृतीची माहिती दिली. मंडेला यांची प्रकृती गेल्या 24 तासांत गंभीर झाल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले. मंडेला यांच्‍या प्रकृतीबाबत त्‍यांची पत्नी ग्रॅसा मॅशेल यांनाही माहिती देण्‍यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेमधील श्‍वेतवर्णी राजवटीविरोधात मंडेला यांनी प्रदीर्घ लढा दिला होता. अनेक दशकांचा तुरुंगवास भोगून बाहेर पडल्‍यानंतर ते दक्षिण आफ्रिकेचे राष्‍ट्रपती झाले होते. मंडेला हे देशाचे प्रथम कृष्णवर्णी राष्ट्राध्यक्ष ठरले होते. 1993 मध्ये मंडेला यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते.