आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nelson Mandela Last Ceremony On 15 December At South Africa

मंडेलांच्या गावी दफनविधी; राष्ट्रपती प्रणव मुखर्जींसह दिग्गज नेते उपस्थित राहणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वुनू (दक्षिण आफ्रिका)- आपले बालपण घालवलेल्या क्वुनू गावीच दिवंगत कृष्णवर्णीय नेते नेल्सन मंडेला अखेरच्या मुक्कामासाठी येणार आहेत. मंडेलांच्या निधनानंतर क्वुनू गाव सुन्न झाले आहे. पुढील रविवारी, 15 डिसेंबर रोजी सरकारी इतमामात मंडेला यांचा दफनविधी करण्यात येणार आहे. भारतातर्फे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह जगभरातील दिग्गज नेते दफनविधीसाठी उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी जोहान्सबर्गच्या 95 हजार प्रेक्षक क्षमतेच्या एफएनबी स्टेडियममध्ये सार्वजनिक शोकसभा होणार आहे. एवढी मोठी शोकसभा होण्याची जगातील ही कदाचित पहिलीच वेळ असेल.
मंडेलांचे पार्थिव तीन दिवस प्रिटोरिया राज्यात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर क्वुनू गावात आणण्यात येणार आहे. पूर्व केपमधील डोंगरदर्‍यांमध्ये वसलेल्या या टुमदार गावात मंडेलांनी आपले बालपण घालवले. याच गावच्या भूमीवर त्यांनी आयुष्यातील सर्वात आनंददायी क्षण घालवले होते. आज या गावावर शोककळा पसरली आहे. गावात एक प्रकारची खिन्नता,भयाण शांतता पसरली आहे. एक महामानव गेला. तो आपल्यातून जाणार हे माहिती असूनही प्रचंड दु:ख झाले आहे. अखेरच्या प्रवासासाठी मंडेलांना सर्वोच्च सन्मानाने निरोप द्यायला हवा, असे त्यांचे भाचे गावचे प्रमुख म्फुंदो तिरारा यांनी सांगितले.
मंडेलांच्या स्मरणार्थ शनिवारी डाव्या आघाडीने कोलकात्यात भव्य मोर्चा काढला होता. मोर्चात नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले. मोर्चा शहराच्या मध्यवर्ती भागात येताच वाहतूक ठप्प झाली. गाड्यांची लांबच लांब रांग लागली होती.
आठवडाभर सार्वजनिक शोकसभा
मंडेलांच्या क्वुनू गावात आठवडाभर सार्वजिनक शोकसभा घेण्यात येणार आहेत. मंडेलांच्या थेंबू जमातीचे राजे दालिनदयेबो जोहान्सबर्गहून मंडेलाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी येणार आहेत. दफनविधीच्या तयारीची कुटुंबीयांशी चर्चा करणार आहेत.
घराभोवती कडेकोट सुरक्षा
सन 1990 मध्ये मंडेलांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी क्वुनू गावात विस्तीर्ण परिसरात घर बांधले होते. या घराभोवती आता कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.दफनविधीच्या तयारीसाठी घराकडे जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत.
द.आफ्रिकेतील गोर्‍यांनाही दु:ख
मंडेलांच्या निधनाने दक्षिण आफ्रि केतील श्वेतवर्णीय नागरिकांनाही दु:ख झाले. श्वेतवर्णीयांची वसाहत असलेल्या काल्क बे गावात मंडेलांना र्शद्धांजली वाहणारे बोर्ड लावले होते. वर्णभेद विसरून एकमेकांवर प्रेम करा, असा मंडेलांचा संदेश लावण्यात आला होता.
दानव वाटत होता, देव झाला
गोर्‍यांच्या वर्णविद्वेषावर एका गौरवर्णीय महिलेनेच मात्र तिखट शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. ते 27 वर्षे तुरुंगात होते तेव्हा तमाम गोर्‍या नागरिकांना मंडेला म्हणजे दानव वाटत होते.आता त्यांना वाटतेय की, साक्षात देव होते, अशा शब्दांत तिने गोर्‍यांच्या दांभिकपणावर टीका केली. अर्थात नाव छापू नका, या अटीवर.