आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nelson Mandela News: When Nelson Mandela Took Gun In Hand

जेव्‍हा शांततेचा नोबेल मिळविणा-या मंडेलांनी हातात घेतली होती बंदूक...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेकडो वर्षांपासून सुरु असलेला वर्णभेद आणि वंशभेदाविरोधात आयुष्‍यभर संघर्ष करणारे नेल्‍सन मंडेला यांनी जगाचा निरोप घेतला. मंडेला हे जगातील सर्वात लोकप्रिय राजकीय नेते होते. त्‍यांनी दक्षिण आफ्रिकेत वर्णभेद करणा-या सरकारच्‍या विरोधात प्रदीर्घ लढा दिला. त्‍यासाठी त्‍यांना 27 वर्षांचा तुरुंगवासही भोगावा लागला. ते 1990 मध्‍ये तुरुंगातून बाहेर आल्‍यानंतर जनतेने त्‍यांना राष्‍ट्रपतीपदावर बसविले. त्‍यांची प्रतिष्‍ठा फक्त आफ्रिकेपुरती मर्यादीत नव्‍हती. त्‍यांना जगभरात मान्‍यता होती. त्‍यांना शांततेचा नोबेल पुरस्‍कार देऊन गौरव करण्‍यात आला. भारतानेही त्‍यांना 'भारतरत्न' देऊन गौरव केला.

मंडेला यांचे आयुष्‍य अतिशय संघर्षमय होते. विरोधकांबद्दल त्‍यांनी कधीही पूर्वग्रहदूषित भावनेतून व्‍यवहार केला नाही. परंतु, शांततेच्‍या नोबेलने सन्‍मानित असलेल्‍या मंडेलांनी गांधीवाद दूर सारुन एकदा शस्‍त्र उचलले होते.

नेल्‍सन मंडेलांच्‍या आयुष्‍यातील अशाच काही गोष्‍टींबद्दल जाणून घ्‍या पुढील स्‍लाईड्समध्‍ये..