आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेल्सन मंडेला कृत्रिम श्वासोश्वासावर; कुटुंबियांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहानसबर्ग - वर्णभेदाविरुद्ध आंदोलन करणारे दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांना सध्या कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवण्यात आले असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.

95 वर्षीय मंडेलांच्या फुफ्फुसात जंतूसंसर्ग झाल्यामुळे गेल्या आठ जूनला त्यांना रुग्णालयात दाखल करण्‍यात आले होते. 23 जूनपासून त्यांची प्रकृती आणखीच खालावली आहे. दोन दिवसांपूर्वी मंडेलांची प्रकृती स्थिर असल्‍याचे सांगण्‍यात आले होते. परंतु, बुधवारी रात्री त्यांची प्रकृती ढासळली.

दक्षिण आफ्रिकेमधील श्‍वेतवर्णी राजवटीविरोधात मंडेला यांनी प्रदीर्घ लढा दिला आहे. अनेक दशकांचा तुरुंगवास भोगून बाहेर पडल्‍यानंतर ते दक्षिण आफ्रिकेचे राष्‍ट्रपती झाले होते. मंडेला हे देशाचे प्रथम कृष्णवर्णी राष्ट्राध्यक्ष ठरले होते. 1993 मध्ये मंडेला यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते.