आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nepal PM Having Only Three Mobile In Property Read More At Divya Marathi

नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांच्याकडे संपत्ती म्हणून केवळ 3 मोबाईल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू - नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला हे जगातील सर्वात गरीब पंतप्रधान आहेत. हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल, मात्र, हे खरं आहे. सुशील कोईराला यांनी सोमवारी त्यांच्या संपत्तीबाबत खुलासा केला. कोईराला यांच्याकडे फक्त 3 मोबाईल फोन आहे. कोईराला यांनी ही माहिती पंतप्रधान कार्यालय आणि काउंसिल ऑफ मिनिस्टर्स (OPMCM) येथे सांगितली.

बॅंक खाते देखील नाही

सुत्रांच्या माहितीनुसार, कोईराला यांच्याकडे न घर आहे ना गाडी. तसेच त्यांच्याकडे सोने-चांदीचे दागिने देखील नाही. अविवाहित असलेल्या कोईराला यांचे कोणत्याही बॅंकेत खात नाही. या वर्षी मार्चेमध्ये त्यांनी स्वत:कडील असलेल्या संपत्तीची माहिती सादर केली. 'मला एक चेक पेमेंटसाठी मिळाला होता त्यावेळी मी बॅंकेत खाते उघडले होते. परंतु ते खाते सध्या सुरू आहे की बंद आहे हेच माहित नसल्याचे कोईराला यांनी स्पष्ट केले. कोईराला यांच्याकडे एक घड्याळ आणि एक सोन्याची अंगठी आहे पण बोटात असलेली अंगठी सोन्याची आहे की, आणखी कोणत्या धातुची आहे, हेही माहीत नसल्याचे कोईराला म्हणाले.
आणि बनले कोईराला नेपाळचे पीएम
74 वर्षीय सुशील कोईराला नेपाळमध्ये त्यांच्या सामान्य जीवनशैलीसाठी ओळखले जातात. गेल्या पाच दशकांपासून नेपाळच्या राजकारणात सक्रिय असणारे कोईराला नेपाळचे 37 वे पंतप्रधान बनले. याआधी त्यांनी कोणतेच पद संभाळलेले नाही हे विशेष. कोईराला यांना वेतनापोटी 56,200 रुपए देण्यात येतात.
पुढे वाचा : उरुग्वेचे जोसे सर्वात गरीब राष्ट्रपती....