आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nepal Prime Ministers No Property News In Marathi

नेपाळी पंतप्रधानांकडे ना बंगला, ना जमीन, फक्त दोन मोबाइल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काठमांडू- भारतात कोट्यधीश नेत्यांची संख्या खूप दिसते, तर शेजारील नेपाळमध्ये वेगळे चित्र आहे. पंतप्रधान सुशील कोईराला यांच्या मालकीचे मात्र घर किंवा जमीनदेखील नाही. दोन मोबाइल केवळ त्यांच्या मालकीचे आहेत.
पंतप्रधानपदावर असलेल्या व्यक्तीकडे कोणती ना कोणती मालमत्ता असते, असे सर्वसाधारण चित्र दिसते. त्याला कोईराला अपवाद ठरले आहेत. त्यांच्या संपत्तीविषयक अर्जावर नेमके लिहायचे काय, असा पेच अधिकार्‍यांसमोर पडला. त्या वेळी ही बाब जाहीर झाली. कोईराला यांच्या मालकीचे घर, जमीन किंवा गुंतवणूक नाही. कार, मोटारसायकलदेखील त्यांच्या नावे नाही, असे मुख्य सचिव बसंता गौतम यांनी सांगितले.

75 वर्षीय पंतप्रधानांच्या नावावर सोने-चांदी किंवा इतर कोणतेही मौल्यवान साहित्य नाही. त्यांच्याकडे केवळ दोन मोबाइल आहेत; परंतु आम्हाला त्याची नोंद अर्जामध्ये करता आली नाही. म्हणून अर्जामध्ये काहीही नमूद न करता तो दाखल केल्याचे गौतम यांनी स्पष्ट केले.

अविवाहित
कोईराला हे अविवाहित असून जीवनशैली अतिशय साधेपणाची आहे. राजकीय क्षेत्रात वावरताना सर्वाेच्च् पदावर असूनही त्यांनी साधेपणा सोडला नाही. नेपाळमधील इतर माजी पंतप्रधानांची मात्र आधुनिक जीवनशैली आहे.