आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Amazing Architecture: कमानीच्या आकारातील विशाल फूड मार्केट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेदरलँड्समधील रोटरडममध्ये इनडोअर फूड मार्केट तयार करण्यात आले असून याची रचनाच लक्षवेधी आहे. एमव्हीआरडीव्ही या संस्थेने या वास्तूची रचना केली आहे. या फूड मार्केटला मोठ्या कमानीसारखा आकार दिला आहे. कमानीच्या आकारात २२८ अपार्टमेंट्स बनवण्यात आले आहेत. त्याचबरोबर फूड मार्केटसाठी मोठा हॉल येथे आहे. या ठिकाणी जवळपास भाज्यांचे १०० स्टॉल्स आणि ८ रेस्टॉरंट्स आहेत. जगातील सर्वात सुंदर फूड मार्केट अशी याची ख्याती आहे. या भव्य इमारतीचा प्रमुख दरवाजा काचेचा असून युरोपमध्ये इतका मोठा काचेचा दरवाजा अन्यत्र कोठेही बसवण्यात आलेला नाही. याच्या छताची रचना कलात्मक असून यावर विविध रंगांचा केलेला वापर पाहण्यासारखा आहे. फूड मार्केटचा उद्देश नजरेसमोर ठेवून छतावर वेगळ्या पद्धतीने फळे आणि भाज्यांची चित्रे रंगवण्यात आली आहेत.
designboom.com