आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेटिझन्ससमोर अमेरिका झुकली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - पायरसी विरोध आणि आयपी संरक्षणाच्या नावाखाली इंटरनेटवर सेंन्सॉरशिप लादण्याचा अमेरिकेचा प्रयत्न तात्पुरता तरी फसला आहे. विकिपीडिया,गुगलसह देशातील हजारो वेबसाइटस्,नेटिझन्सच्या विरोधासमोर अखेर अमेरिकी सरकारला झुकावे लागले. सोपा आणि पिपा हे वादग्रस्त विधेयक पुढे ढकलण्याची घोषणा शुक्रवारी संसदेचे सभागृहाला करावी लागली.
आयपी संरक्षण (पिपा) हे विधेयक सिनेटमध्ये आणि ऑनलाइन पायरसी (सोपा) विधेयक हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह येथे येत्या मंगळवारी,23 तारखलेला मांडण्यात येणार होते.परंतु गेल्या आठवड्यातील घटना-घडामोडी पाहता हे विधेयक पटलावर ठेवण्यात येणार नाही अशी घोषणा सिनेट सभागृह नेते हॅरी रिड यांनी केली. या विधेयकाविरोधात विकिपीडियाने बुधवारी आपली बेबसाईट बंद ठेवून प्रत्यक्ष आंदोलनच सुरू केले. गुगलसारख्या जगविख्यात कंपनीनेही लोगोवर काळा डाग लावून निषेध नोंदवला होता. या आंदोलनामुळे विरोधाची धार अधिकच धारदार होऊन संपूर्ण अमेरिकेत त्याला पाठिंबा मिळाला होता. दरम्यान शुक्रवारी अमेरिकी सरकारने पायरसीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या मेगाअपलोड वेबसाईटच्या कार्यालयावर छापे मारले होते. त्याच्या न्यूझीलंडमधील कार्यालय आणि पायरसी डॉन किम डॉटकॉमच्या घरावरही छापे मारण्यात आले. परिणामी हॅकर्सनी गुप्तचर संस्था एफबीआयसह अमेरिकेच्या अनेक वेबसाइटवर हल्ला करून त्या बंद पाडल्या होत्या. इंटरनेटवर बंधने म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची, लोकशाहीची गळचेपी असल्याची भावना देशभरÞात निर्माण झाली होती.शिवाय संसद सदस्यही हा रोष पाहून विधेयकास पाठिंबा देण्यात तयार नव्हते अखेर विधेयकाविरोधात आंदोलन तीव्र होताच सरकारने सपशेल लोटांगण घातले. या विधेयकामधील काही मुद्दे अयोग्य असतील तर त्यावर तोडगा काढला जाऊ शकतो.गेल्या आठवड्यात त्यावर विचारविनिमय,चर्चा करण्यात आली. येत्या काही आठड्यात तोडगा निघेल असे रिड म्हणाले.
01
लाख रुपये रोज असलेल्या हॉटेलमध्ये हायस्पीड सव्हर्स,मोठे टीव्ही स्क्रिन्स ठेवण्यात आले होते. मेगालोडचा संस्थापक किम डॉटकॉम ऊर्फ किम श्मिट्झ याला न्यूझीलंडमध्ये अटक करण्यात आली.त्याच्यासह अन्य तीन जणांना न्यायालयाने जामीन फेटाळला आहे.
48
लाख डॉलर्सच्या आलिशान गाड्या यात 1959 चे मॉडेल गुलाबी रंगाची कॅडिलॅक,रोल्स रॉयस फँथम आदी किमच्या ऑकलंड येथील प्रासादातून जप्त करण्यात आल्या. किम डॉटकॉम न्यूझीलंडमध्ये असल्यामुळे त्याचे अमेरिकेत प्रत्यार्पण करण्यासाठी एफबीआय प्रयत्न करीत आहे.