आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकीपेडिया आज बंद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - समस्त नेटीझन्ससाठी ही बातमी आहे. बुधवारी विकीपेडिया बंद राहणार आहे. त्यामुळे उगाच त्याला झटत बसू नका. त्याला कारण ठरले आहे अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहासमोर मांडण्यात आलेले पायरसी प्रतिबंधक विधेयक. हे विधेयक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात असून ते रचनात्मक नाही, असा आरोप करत त्याच्या निषेधासाठी विकीपेडियाने बुधवारी चोवीस तास वेबसाइटचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे विधेयक मंजूर झाले तर वाक स्वातंत्र्यावर गदा येणार आहे, अशी भीती सोशल नेटवर्किंग साइट्सला वाटू लागली आहे. हा निर्णय हुकूमशाहीचा आहे. विकीपेडियाचे इंग्रजी व्हर्जन चोवीस तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.