Home »International »Bhaskar Gyan» Neuro Modulation And Urine Control

महिलेच्या शरीरात उपकरण : युरिन पास करण्यासाठी रिमोट कंट्रोलचा वापर

दिव्य मराठी नेटवर्क | Sep 29, 2011, 01:49 AM IST

  • महिलेच्या शरीरात उपकरण : युरिन पास करण्यासाठी रिमोट कंट्रोलचा वापर

लुधियाना. लुधियानातील एका महिलेच्या शरीरात ऑपरेशनद्वारे एक उपकरण बसवण्यात आले आहे. यामुळे तिला होणारा लघवीचा त्रास कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. लुधियानातील दयानंद मेडिकल क़ॉलेजच्या (डीएमसी)डॉक्टरांनी हे ऑपरेशन केले आहे. या उपकरणाचे रिमोट दाबल्यानंतर रुग्णाच्या शरीरातील युरिन पास होण्यास सुरुवात होते.
डीएमसीच्या डिपार्टमेंट ऑफ युरोलॉजी आणि ट्रांसप्लांट युनिटचे हेड बलदेव सिंग औलख यांनी सांगितले की, हा उत्तर भारतातील पहिला प्रयोग आहे. या महिलेला नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह युरिनरी रिटेंशन नावाचा आजार झाला होता. या आजारामुळे युरिनरी ब्लेडरचे स्नायू आणि मूत्र वाहून नेणाºया वाहिन्या कमकुवत होतात. त्यामुळे युरिनरी ब्लेडर रिकामे होऊ शकत नाही. परिणामी रुग्णाच्या मूत्राचा स्राव होत राहतो. 37 वर्षांची ही महिला कित्येक वर्षांपासून या आजाराने ग्रस्त होती. आतापर्यंत पाइपच्या मदतीने तिची लघवी बाहेर सोडली जात होती.
दयानंद मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी या महिला रुग्णाच्या शरीरात रिमोट कंट्रोलद्वारे युरिन पास होण्याचे यंत्र लावल्यापासून तिच्या वेदना कमी झाल्या आहेत.
उपकरण कसे काम करते?
डॉ. औलख यांच्या मते, न्यूरो मॉड्युलेशन नावाचे हे एक अमेरिकन उपकरण आहे. ब्लेडर युरिनचा पुरवठा करणाºया वाहिन्या आणि स्नायूंना मणक्यांच्या हाडांसहित या उपकरणाच्या तारांशी जोडले जाते. त्यानंतर या उपकरणाला शरीरातच लावले जाते. त्यानंतर रुग्ण रिमोटद्वारे हे यंत्र चालवू शकते.
यंत्रासाठी खर्च किती?
डॉ. औलख यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ऑपरेशनमध्ये जास्त खर्च उपकरणावरच केला जातो. हे उपकरण सहा लाख रुपयांचे आहे. ऑपरेशन फक्त एका तासाचे आहे आणि त्याचा खर्च चाळीस हजार रुपयांपर्यंत येतो.

Next Article

Recommended