वॉशिंग्टन - सैनिक कराराला सहमती दिल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी अफगाण सरकारचे आभार मानले आहेत. या नव्या करारानुसार २०१४ नंतरही काही अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात ठेवण्यास येथील नेतृत्वाने मान्यता दिली आहे.
मंगळवारी आेबामा यांनी अफगाण राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी व येथील कार्यकारी प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्याशी व्हिडिआे काॅन्फरसिंगद्वारे संवाद साधला. अमेरिका
इराकमधील सैनिक मिशन संपूर्णत: बंद करेल आणि अफगाणिस्तानात सैन्य प्रशिक्षण व अफगाण सैन्याला सल्ला देण्याचे काम सुरू ठेवेल, असे या नव्या करारानुसार निश्चित करण्यात आले आहे. अफगाण नेत्यांनीही याला मंजुरी दिली आहे.