आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकव्याप्त काश्मिरात पाकिस्तानचे नवे विमानतळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकव्याप्त काश्मिरातील गिलगिट येथे पाकिस्तानने नवे विमानतळ बांधले आहे. त्याचे उद्घाटन शुक्रवारी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या हस्ते झाले. या विमातळावरून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटक ये-जा करू शकतील.
स्कार्दू भागातही जेट विमान उतरवण्याचे माझे स्वप्न आहे, असे शरीफ म्हणाले. दोनच दिवसांपूर्वी शरीफ यांनी जम्मू-काश्मीरला ‘आझाद’ करण्याचे स्वप्न असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. गिलगिट यापूर्वी जम्मू-काश्मीरचाच भाग होता. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या दिवसांतच पाकिस्तानने या भागावर कब्जा केला होता.
पाच दशकांपूर्वीपर्यंत इथे हिंदू राजांचे राज्य होते. बर्फाळ भागातील प्राचीन सिल्क रूटवर हे शहर आहे. येथील निसर्गरम्य परिसर व साहसी खेळांसाठी हजारो पर्यटक दरवर्षी या भागाला भेट देतात. याच्या पश्चिमेला खैबर पख्तुनख्वा आणि उत्तरेला अफगाणिस्तान व चीन आहे. सन 2009 मध्ये पाकिस्तान सरकारने उत्तर भागाचे नाव बदलून गिलगिट बाल्टिस्तान केले. इथे वेगळी प्रशासन व्यवस्था आहे.शरीफ यांनी गिलगिट बाल्टिस्तान कौन्सिलच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचेही अध्यक्षस्थान भूषवले. पाकिस्तान सरकारने गतवर्षी या क्षेत्राच्या विकासासाठी 800 कोटी रुपये दिले होते. येथील सन 2013-14 चे बजेट 54.3 कोटी रुपयांचे आहे.