आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Chinese Leader Not In Favour Of Democracy ; Today Ruling Party Meeting

नव्या चिनी नेतृत्वाला लोकशाहीचे वावडेच ; सत्ताधारी पक्षाची आज बैठक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिजींग - चीनमधील सत्ताधारी पक्षाच्या नवीन नेतृत्वाने राजकीय सुधारणांना फेटाळून लावण्यात आले. लोकशाही व्यवस्थेची देशाला गरज नसल्याचे नेतृत्वाकडून सोमवारी जाहीर करण्यात आले.

नॅशनल पीपल्स काँग्रेसची राष्ट्रीय बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीत सत्तेची सूत्रे नवीन नेतृत्वाकडे सोपवण्यात येणार आहेत, असे एनपीसीचे प्रवक्त्या फु यिंग यांनी सोमवारी स्पष्ट केले. राजकीय सुधारणांसाठी चीन इतर देशांच्या राजकीय व्यवस्थेच्या मॉडेलचे अनुकरण करणार नाही. शि जिनपिंग याच आठवड्यात सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेतील. राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ आणि पंतप्रधान वेन जिआबाओ निवृत्त होणार आहेत. त्यानंतर जिनपिंग यांच्याकडे देशाचे नेतृत्व असेल. देश योग्य त्या मार्गाने वाटचाल करून विकास करत आहे. त्यामुळे विकासाचा हा मार्ग आम्ही सोडून द्यावा, यामागे काहीही कारण दिसत नाही. राजकीय सुधारणेचा यशस्वी मॉडेलशिवाय देशात असा बदल केला जाऊ शकत नाही, असे वेन यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे.
सांस्कृतिक पातळीवर सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. निवृत्तीनंतरही अशा सुधारणेसाठी प्रयत्नशील रहाणार असल्याचा विश्वास पंतप्रधान वेन यांनी व्यक्त केला. गेल्या तीस वर्षांत चीनमध्ये आर्थिक सुधारणा घडून आल्या आहेत.

डिफेन्स बजेट
आशियातील शांतता आणि स्थैर्यासाठी देशाच्या संरक्षणविषयक अर्थसंकल्पात मोठी तरतूद करणे गैर नाही. खंडाच्या सुरक्षेसाठी देशाची मोठी भूमिका असल्याचे चीनने म्हटले आहे.