आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रापामायसीन मूत्रपिंड आजारावर उपयोगी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - रोगप्रतिकारक संप्रेरक म्हणून वापरण्यात येणा-या रापामायसीनचे नवे औषध मूत्रपिंडाच्या आजारावर अधिक फायदेशीर ठरू शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. इंडियानातील सांता बार्बरा विद्यापीठ आणि एका बायोटेक कंपनीतील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. पॉलिस्टिक प्रकारातील मूत्रपिंडाच्या आजारात होणारी सिस्टची वाढ प्रोटीन रोखू शकते.
रापामायसीनच्या एफसी रापामायसीन औषधीतील घटक मूत्रपिंडातील आजारात उद्भवणा-या सिस्टची वाढ रोखू शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. एफसी रापा औषधातील घटक आजारी मूत्रपिंडाला टार्गेट करतात.
त्यामुळे हे औषध अधिक उपयोगी ठरू शकते, असा दावा मॉलिक्यूलर, सेल्यूलर विभागातील असोसियट प्रोफेसर थॉमस विम्बस यांनी केला आहे. 2006 मध्ये
केलेल्या अभ्यासात मूत्रपिंडावरील आजारात उपयोगी ठरणा-या रापामायसीन औषधाचे महत्त्व सिद्ध झाले.