आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या कानातल्यांमध्‍ये व्हिडिओ डिस्प्ले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्लोरिडातील मियामी येथे राहणार्‍या मायकल मॅक्लेरन या डिझायनर आणि त्यांच्या टीमने महिलांसाठी खास व्हिडियो इअररिंग तयार केले आहेत. या कानातल्यांच्या 2.2 इंचाच्या स्क्रीनवर व्हिडिओ, फोटो, स्क्रीन सेव्हर प्ले करता येतात. कार्बन फायबरपासून तयार झाल्यामुळे हे कानातले वजनाला हलके असतात. कानातले चार्ज करण्यासाठी व डाटा ट्रान्सफर करण्यासाठी यूएसबी केबल वापरले जाते. एकदा चार्ज केल्यानंतर या कानातल्यांमध्ये चार ते आठ तास व्हिडिओ पाहता येतात. हे कानातले सध्या प्रायोगिक स्वरूपात तयार करण्यात आले आहेत. 2 जीबी, 4 जीबी आणि 8 जीबी स्टोरेजचे कानातले अनुक्रमे 13 हजार, 16 हजार आणि 19,500 रुपये किमतीत लाँच केले जाणार आहेत.
B technabob.com