आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Economical Reform Program Will Implement In China For Tenth Years

चीनमध्‍ये दहा वर्षांसाठी नवा आर्थिक सुधारणा कार्यक्रम लागू करण्‍याचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चिनी नेत्यांनी आगामी दहा वर्षांसाठी नवा आर्थिक सुधारणा कार्यक्रम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुक्त बाजारपेठेबरोबर सरकारसोबतचे संबंध सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. चीनमधील आर्थिक उदारीकरणाचा हा तिसरा टप्पा आहे.
बंद दरवाजाआड झालेली बैठक म्हणजे तिस-या प्लेनमनंतर सरकारने जारी केलेल्या निवेदनात सुधारणा कार्यक्रमामध्ये मुक्त बाजारपेठेची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. सामाजिक अस्थिरतेवर नियंत्रण ठेवू शकणारी नवी समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती चीनमधील अंतर्गत सुरक्षा प्रकरणांमध्ये लक्ष घालेल. या अहवालानुसार शेतक-यांना त्यांच्या जमिनीवर जास्त अधिकार दिले जातील. बैठकीत सहभागी नेते अन्य नेत्यांचे मन वळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगण्यात येते. तिसरी प्लेनम बीजिंगमध्ये शुक्रवारी सुरू झाली आणि काही मुद्द्यांवर सहमती होऊन ती संपली. नवा सुधारणा कार्यक्रम चीनच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातो.
बाजारपेठ आणि सरकार
येत्या काही दिवसांत चीनमध्ये आर्थिक व सामाजिक क्षेत्रात केल्या जाणा-या बदलांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ‘तिस-या प्लेनम’च्या अहवालामध्ये चिनी लष्कराला अत्याधुनिक बनविणे, चीनच्या किनारपट्टी क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचेही उद्दिष्ट आहे. याव्यतिरिक्त भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी मजबूत संस्था स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. अर्थव्यवस्थेमध्ये व्यापक बदल घडवून आणण्यासाठी सरकारने विकास प्रक्रिया नव्या उंचीवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. चिनी बाजारपेठेवर सरकारची घट्ट पकड आहे.
जुने प्लेनम
तिसरी प्लेनम चीनसाठी महत्त्वपूर्ण मानली जाते. प्लेनम म्हणजे चीनच्या कम्युनिस्ट पार्टीतील केंद्रीय समितीचे नवे पदाधिकारी बैठक घेतात. यामध्ये सर्व सदस्य सहभागी होतात. नव्या पदाधिका-यांच्या पदभारास वर्ष उलटल्यानंतर ही बैठक घेतली जाते. सन 1978 च्या प्लेनममध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डेंग झियोओपिंग यांनी अर्थव्यवस्था बाजारपेठेसाठी खुली करण्याची पहिली घोषणा केली होती.त्यानंतर सन 1993 मध्ये जियांग झेमिन यांनी आर्थिक सुधारणांचा दुसरा टप्पा जाहीर केला होता.