Home »International »Other Country» New Facebook App To Allow Free Voice Calls To Friends

फेसबुकवरुन करा आता 'व्‍हॉईस कॉल'

वृत्तसंस्‍था | Jan 07, 2013, 16:12 PM IST

  • फेसबुकवरुन करा आता 'व्‍हॉईस कॉल'

लंडन- सोशल मिडियामधील आघाडीची वेबसाईट फेसबूकने युझर्ससाठी 'व्‍हॉईस कॉल'ची सुविधा उपलब्‍ध केली आहे. अशा प्रकारची सुविधा देणारी 'फेसबुक' ही सोशल नेटवर्कींगमधील पहिलाच वेबसाईट ठरली आहे.

सोशल नेटवर्कींगमध्‍ये फेसबुक ही आघाडीची वेबसाईट आहे. लोकप्रियता टीकून राहण्‍यासाठी फेसबुकने सतत नवे फिचर्स दिले आहेत. आता फेसबुकने 'व्‍हॉईस कॉल'ची सुविधा सुरु केली आहे. 'व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल' या तंत्राचा वापर यासाठी करण्यात आला आहे. सध्या ही सेवा कॅनडातील ग्राहकांसाठी उपलब्ध असली, तरी काही महिन्‍यांमध्‍ये जगभरातील फेसबुकच्या युझर्सला याचा फायदा मिळणार आहे. ही सुविधा स्‍मार्टफोन्‍सवर मिळणार आहे. नुकतेच अपडेट केलेल्‍या फेसबुक मेसेंजरवरुन व्‍हॉईस कॉल करता येईल. ही सुविधा मोफत असली तरी मोबाईलच्‍या डाटा पॅकमधून डाटा वापरण्‍यात येईल.

या ऍप्लिकेशनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोफत कॉल करण्याबरोबरच, कॉलचे सर्व संभाषण फेसबूकच्या सर्व्हरवर सेव्ह करता येणार आहे. यामुळे या संभाषणाचा गैरवापर टाळण्यास मदत होईल. याशिवाय कॉन्फरन्स कॉलची सुविधाही उपलब्ध होणार आहे. त्‍यात एकाचवेळी किमान 4 ते 6 जण संवाद साधू शकतात.

Next Article

Recommended