आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकचा ‘पुस्तक वाचन प्रोग्राम’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - फेसबुकची लोकप्रियता वाढवण्यासाठी २०१५ मध्ये त्यावर नवे फीचर्स आणणार असल्याचे कंपनीचे संचालक मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर केले आहे. फेसबुकला वाचनीय करण्याच्या उद्देशाने झुकेरबर्गने यावर नवे पेज अॅड केले आहे. ‘अ इयर ऑफ बुक्स’ नावाच्या या पेजवर त्यांनी आपल्या मित्रांना जॉइन होण्याचे आवाहन केले असून एकाच दिवसात याला १ लाख लाइक्स मिळाले आहेत. या प्रोग्रामसाठी मॉइसेस नाइमचे ‘द एंड ऑफ पॉवर : फ्रॉम बोर्डरूम्स टू बॅटलफील्ड्स अँड चर्चेस टू स्टेट्स, व्हाय बीइंग इन चार्ज इझंट व्हॉट इट युज्ड टू बी’ हे पहिले पुस्तक झुकेरबर्ग यांनी निवडले आहे.