आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Gold Mine Found In A Cocoa In Western Ivory Coast

PHOTOS : पश्चिम आफ्रिकेतील शेतात सोन्याचे पीक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयव्हरी कोस्ट - घाना आणि आयव्हरी कोस्ट हे दोन देश पश्चिम आफ्रिकेत वसलेले आहेत. येथील नागरिकांचे जीवन कोकोच्या उत्पादनावर आहे. जगातील एकूण उत्पादनाच्या 60 टक्के एवढी कोकोची निर्यात येथून केली जाते; परंतु गेल्या काही दिवसांत येथील शेतकर्‍यांनी त्याचे उत्पादन घेण्याकडे जवळपास पाठ फिरवली आहे. कारण सरकारकडून त्याला मिळणारा हमीभाव अत्यंत कमी आहे. हे शेतकरी सध्या शेतामध्ये खोदण्याचे काम करत आहेत. कोकोच्या झाडांजवळ छोटे-मोठे खड्डे खोदून सोने शोधण्याचे काम करत आहेत. अनेकांना त्यात यशदेखील मिळाले आहे.

कोको उत्पादनाचे असे नुकसान
शेतकर्‍यांनी सोन्याच्या शोधात शेतामध्ये जोरदार उत्खनन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. त्यामुळे कोकोच्या मुळांना लागून असलेली माती निघून जाऊ लागली आहे. परिणामी, झाडे वाळून जाऊ लागली आहेत. नवीन रोपटीदेखील लावणे बंद करण्यात आले आहे.

रोज किती सोने?
- 09 ग्रामपर्यंतचे सोने रोज शेतकरी काढत आहेत.
- 200 डॉलरपर्यंतची रोज कमाई.
- अर्थात वार्षिक सुमारे 72 हजार डॉलर.
- कोको उत्पादनातून मिळणार्‍या पैशांहून 36 पट अधिक कमाई.

- कोकोचे उपयोग
कॉस्मेटिक उत्पादने, चॉकलेट, सॉफ्ट ड्रिंक्स, आइस्क्रीम, जीवनसत्त्व क

फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...