आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञानाच्या पूर्वीही सोशल नेटवर्किंगचे अस्तित्व

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - सध्याचा जमाना फेसबुक, ट्विटरचा असला तरी सोशल नेटवर्किंगचे अस्तित्व मात्र प्राचीन काळातही होते. त्या काळीदेखील दूरच्या समुदायाच्या संपर्कात राहण्याचे तंत्र विकसित झालेले होते, असा दावा संशोधकांनी केला आहे. चिनी मातीपासून तयार करण्यात आलेल्या अनेक वस्तूंचा अभ्यास संशोधकांनी केला आहे. इसवीसन 1200 ते 1450 या कालखंडातील अभ्यास करण्यात आला आहे. त्यावेळी सोशल नेटवर्किंगचे अस्तित्व होते. समान नक्षीची भांडी गावात वापरली जात. प्रत्येकी 250 किलो मीटर अंतरावरील गावात अशी भांडी होती. दोन्ही गावांतील लोकांनी परस्परांशी संबंध राखण्याचा संदेश त्यातून दिला जात होता, असे अँरिझोना विद्यापीठातील मानववंश शास्त्रज्ञ बार्बरा मिल्स यांचा दावा आहे.