आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Insider Attacks Target The Police In Afghanistan

अफगाण पोलिसाचा सहकार्‍यांवर गोळीबार, 7 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल - अफगाणिस्तानातील एका पोलिसाने रस्त्यावरील चौकीत सहकार्‍यांवर गोळीबार केल्याने सात पोलिस ठार झाल्याची घटना बुधवारी घडली. अफगाणमध्ये देशांतर्गत लष्करातील जवान, पोलिस किंवा वर्दीतील पोलिसांनी सहकार्‍यांवरच हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. तिरिन कोटची प्रांतीय राजधानी येथे सात पोलिसांवर गोळीबार करून हल्लेखोर पोलिस मृतांची सर्व हत्यारे घेऊन पोलिसांच्याच वाहनातून फरार झाला. हल्लेखोराचे तालिबानशी संबंध असल्याचा अधिकार्‍यांचा संशय आहे. याआधी एक दिवस अफगाण लष्कराच्या वर्दीतील जवानाने सोबत असलेल्या पथकावर गोळीबार केला. त्यात एका अमेरिकन मेजर जनरलचा मृत्यू झाला, तर 15 अमेरिकी जवान जखमी झाले.