आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर हेरगिरी रोखण्यासाठी ब्राझीलचा स्वतंत्र कायदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राझिलिया- सायबर हेरगिरी रोखण्यासाठी ब्राझील लवकरच एक नवा इंटरनेट कायदा बनवणार आहे. या कायद्यानुसार गुगल आणि फेसबुकसारख्या कंपन्यांना सर्व्हर आणि डाटा सेंटरही ब्राझीलमध्येच उभारावे लागणार आहेत. ते एकही शब्द देशाबाहेर पाठवू शकणार नाहीत. अमेरिकेच्या हेरगिरी प्रकरणानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ब्राझीलमध्ये हा कायदा करण्यात येणार आहे.

नव्या कायद्याच्या मुसद्याला मंगळवारी जनतेसमोर ठेवण्यात आले.आंतरराष्ट्रीय इंटरनेट कंपन्यांना देशातच डाटा सेंटर बनवण्याचे आदेश देण्याचे अधिकार राष्ट्राध्यक्षा दिल्मा रोसेफ यांना देण्यात आले आहेत.ब्राझीलसह अनेक देशांची अमेरिकेमार्फत सायबर हेरगिरी होत असल्याचा गौप्यस्फोट अमेरिकी एडवर्ड स्नोडेन याने केला होता.राष्ट्राध्यक्षा रोसेफ यांच्यासह अनेक नेते व सामान्य नागरिकांच्याही फोन, ईमेलवर अमेरिकेची निगराणी सुरू होती. त्याप्रकरणानंतर राष्ट्राध्यक्षांनी हा कायदा करण्याचचे आदेश दिले होते.

कायद्याला संसदेत अडथळे : ब्राझील सरकारसाठी हा कायदा लागू करण्यात अडचणी आहेत. प्रमुख इंटरनेट कंपन्यांनी त्याला विरोध सुरु केला आहे.कायद्याचा मसुदा तयार करणारे संसद सदस्य अलेक्झांद्रो मोलोन यांनीच हा कायदा संसदे पारित होण्याबाबत शंका व्यक्त केली आहे.या कायद्यानंतर 10 कोटी नागरिकांचे खासगी आयुष्य धोक्यात येऊ शकते असे ते म्हणाले.