आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरनेट होईल सुपरफास्ट; प्रोटोकॉल व्हर्जन सुरु

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन: 'इंटरनेट स्लो'च्या डोकेदुखीतून आता इंटरनेट यूजर्सची सुटका होणार आहे. इंटरनेटवर झपाटाने घटत असलेल्या वेब अँडरेसच्या समस्येचे समाधान झाले आहे. आता कोट्यवधी वेब अँडरेस सुरक्षित ठेवणारी प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. ती नवी प्रणाली म्हणजेच 'प्रोटोकाल व्हर्जन 6' (आयपीव्ही 6) प्रोटोकॉल व्हर्जन बुधवारी सुरु झाले आहे.
यापूर्वी 'आयपीव्ही 4' प्रोटोकॉलचा वापर होत होता. केवळ चार अब्ज आयपी अँडरेसला हा प्रोटोकॉल सपोर्ट करत होता. परंतु इंटरनेटचा वापर करणार्‍यांची संख्या चार अब्ज पेक्षा अनेक पटीने वाढली आहे. अशा परिस्थिती आयपी अँडरेसचे वितरण करणे अवघड होऊन बसले होते. त्यामुळे वेब अँडरेस लवकरच नष्ट होत होते, परंतु नव्या प्रोटोकॉलमुळे ही समस्या संपुष्‍टात आली आहे. नव्या प्रोटोकॉलच्या सहाय्याने वेगळ्या आयपी अँडरेसशी देखील आपलाला कनेक्ट होता येणार आहे. नवा प्रोटोकॉल भविष्यात इंटरनेटचा वापर करणार्‍यांसाठी अधिक सोयीचे होणार असल्याचे इंटरनेट सोसायटीचे प्रमुख तांत्रिक अधिकारी लेजली डेगल यांनी सांगितले.
इंटरनेट वापरामध्ये महाराष्ट्र अव्वल
इंटरनेट वापरणा-यांसाठी खास माहिती
हायस्पीड इंटरनेट सेवेचा मार्ग मोकळा