आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्झायमरने ग्रासलेल्या आजोबांसाठी नातवाने बनवले एक उपकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१५ वर्षांच्या कॅनेथ शिनोजुकाने आजोबांचा आजार पाहून लाखो लोकांच्या जीवनात बदल घडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. न्यूयॉर्कमध्ये राहणारा ११ व्या वर्गातील हा विद्यार्थी असून केनेथने अल्झायमर रुग्णांच्या वेदना आणि दु:ख जाणले. त्यांच्यासाठी एक उपकरण तयार केले. हे उपकरण कपडे, पायमोजे किंवा अन्य कोणत्याही वस्तूशी जोडले जाऊ शकते. यावर दाब पडताच ते कार्यान्वित होते.
एखादा रुग्ण जागेवरून उठलाच, तर अ‍ॅपद्वारे स्मार्टफोनवर अलर्ट मेसेज पाठवते. केनेथ सांगतो, एकदा माझे आजोबा रात्रीच्या वेळी बाहेर भटकत होते. ती रात्र मी विसरू शकत नाही.केनेथच्या या कार्यासाठी सायंटिफिक अमेरिकन सायन्स इन अ‍ॅक्शन अवॉर्ड देण्यात आला. विज्ञान मेळ्यात हे उपकरण ठेवण्यापूर्वी केनेथने सहा महिने याचा प्रयोग आजोबांसाठी करून पाहिला. यादरम्यान या उपकरणात असलेल्या सेन्सरमुळे ४३७ वेळा अलर्ट मेसेज पाठवला होता.
omnifeed.com