(फोटो - यू-ट्यूबच्या व्हिडिओमधील दृश्य)
बेरुत - ISIS या दहशतवादी संघटनेने एक नवा व्हिडिओ प्रसारीत करून अमेरिकेला पुन्हा इशारा दिला आहे. अमेरिकेने
इराकला सैन्य पाठवण्याचा प्रयत्न केल्यास, ISIS चे सदस्य त्यांच्या स्वागतासाठी तयार आहे, अशा भाषेत अमेरिकेला आव्हान देण्यात आले आहे.
ISIS ने 52 सेकंदाच्या या व्हिडिओला 'फ्लेम्स ऑफ वॉर' असे नाव दिले आहे. हॉलीवूडच्या एखाद्या चित्रपटाप्रमाणे शूट करण्यात आलेला आहे. यात ISIS चे सदस्य रणगाडे उध्वस्त करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच अनेक अमेरिकन सैनिकही जखमी तर काही मृतावस्थेत दाखवण्यात आले आहेत.
व्हिडिओ क्लिपमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा असे म्हणताना दाखवण्यात आले आहे की, सैनिक
इराकला परत येणार नाहीत. तर व्हिडिओच्या शेवटी काळ्या रंगाच्या बॅकग्राऊंडवर टेक्स्ट फ्लॅश होताना दाखवले आहे. त्यावर, ही तर युद्धाची सुरुवात आहे... अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे.
हा व्हिडिओ म्हणजे जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल मार्टीन डेम्पसे यांना आयएसआयएसचे उत्तर असल्याचे समजले जात आहे. इराकसाठी वापरण्यात येत असलेली रणनीती कामी आली नाही, तर सैनिकांना पाठवण्याची शिफारस केली जाऊ शकते, असे मार्टीन म्हणाले होते.
पुढील स्लाइडवर पाहा PHOTO, तर अखेरच्या स्लाइडवर VIDEO...