आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Keyboard For Superfast Typing On Touchscreens

सुपरफास्ट टायपिंगसाठी टचस्क्रीन की-बोर्ड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन- टचस्क्रीनवर वेगाने आणि सहजपणे टायपिंगसाठी नवीन की-बोर्ड विकसित करण्यात आला आहे. सध्याच्या क्वेर्टी लेआऊटहून याचा वेग अनेक पटींनी अधिक असेल.


सध्याचे फोन किंवा टॅब्लेटवर टायपिंग करताना अडचणी येतात. क्वेर्टीचे लेआऊट सर्व टॅब्लेट आणि टचस्क्रीन यांना साजेसे नाही. टचस्क्रीन उपकरणावरील टायपिंगची गती मिनिटाला 20 शब्द अशी असते. मॅक्स प्लांक इन्स्टिट्यूट फॉर इन्फर्मेटिक व सेंट अँड्र्यूज अँड माँटाना टेक्निकल विद्यापीठातील संशोधकांनी नवीन की-बोर्ड विकसित केला आहे. टचस्क्रीनवर टाइप करताना युजरच्या दोन्ही अंगठ्यांची समान हालचाल होते. एका अंगठ्याचा वापर होत असताना दुसरा नवीन लक्ष्य गाठण्याच्या दिशेने जाताना दिसतो. या तंत्राने अंगठ्याच्या हालचालीचा वेग कमी करण्यात येतो.

उपलब्धता कशी?
केएएलक्यू की-बोर्ड अँड्रॉइड स्मार्टफोनधारकांसाठी मोफत अ‍ॅप्लिकेशन म्हणून उपलब्ध करून दिले जाणार आहे. मे महिन्यापासून हे अ‍ॅप डाऊनलोड करता येऊ शकेल.

34 टक्के अधिक वेग इतर क्वेर्टी लेआउटपेक्षा.
38 शब्द प्रतिमिनिट वेग नव्या की-बोर्डमुळे.

कसे झाले विकसित ?
संगणकाच्या साहाय्याने बोटांच्या ठशांचा अभ्यास करण्यात आला. या प्रयोगात लाखो युजर्सच्या ठशांची माहिती गोळा करण्यात आली. त्यानंतर नवीन की-बोर्ड विकसित करण्यात आला.

कसा आहे नवीन की-बोर्ड?
केएएलक्यू असे नवीन की-बोर्डचे नाव असून त्यात वाय अक्षर सोडले तर सर्व स्वरांचा समावेश आहे. उजव्या अंगठ्याच्या तुलनेने डाव्या अंगठ्याच्या बाजूकडे अधिक की देण्यात आल्या आहेत.