आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खबरदार, \'हिटलर\' असे उच्चाराल तर तुरुंगाची हवा खाल!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को- जगावर दुसरे महायुद्ध लादणारा जर्मनीचा हुकुमशहा एडोल्फ हिटलर याने ज्यू लोकांवर केलेले अत्याचार सर्वश्रुत आहेत. त्यामुळे 'हिटलर' असे जरी उच्चारले तरी त्याला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. रशिया एक नवा कायदा करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार एडोल्फ हिटलर तसेच नाझी विचारधारेचा प्रचार करणार्‍या व्यक्तीला पाच वर्षांचा कारावास आणि 15 हजार डॉलरचा दंड, अशा शिक्षेचे प्रावधान आहे.

सत्ताधारी यूनाईटेड रशिया पक्षाचे खासदार इरीना यारोव्या यांनी सां‍‍‍गितले की, हिटलर विचारसरणीविरोधी कायद्याबाबत संसदेत चर्चा होणार आहे. दुसर्‍या जागतिक महायुद्धात सोव्हियत संघाच्या लाल सेनेचे ऐतिहासिक योगदान लाभले होते. ते विसरुन चालणार नाही. त्यामुळे लाल सेनेचे योगदान न मानणार्‍या तसेच त्याची निंदा करणार्‍यांवरही कारवाईचे प्रावधान या कायद्यात असणार आहे.

यारोव्या म्हणाले, दुसर्‍या जागतिक महायुद्धात सोव्हियत संघाने एक संरक्षकाची भूमिका निभावली होती. संपूर्ण जगाला नाझी जर्मनीपासून मुक्त करणे, हेच लाल सेनेचे प्रमुख कार्य होते.