Home »International »Bhaskar Gyan» New Mositure

त्वचेला मॉइश्‍चराइज करणारी जिन्स लवकरच

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 19, 2013, 06:38 AM IST

  • त्वचेला मॉइश्‍चराइज करणारी जिन्स लवकरच


डेनिम खूप जाड असते. जिन्स खूप वेळ घातल्यामुळे त्वचेतील ओलावा कमी होतो. ही तक्रार दूर करण्यासाठी रँगलर या आंतरराष्ट्रीय ब्रँडने एक खास डेनिम रेंज लाँच करण्याचे ठरवले आहे. डेनिम
स्पा नावाचे हे कलेक्शन डेनिमच्या पाणी शोषून घेण्याच्या प्रक्रियेपासून त्वचेचे संरक्षण करतील अशा खास घटकांपासून बनले आहे. तसेच ही जिन्स घातल्यावर त्वचा नरम पडल्याची जाणीव होईल.
या मॉइश्चरायझिंग जिन्समध्ये फिनिशेज अ‍ॅलोवेरा, ऑ लिव्ह एक्स्ट्रॅक्ट आणि स्मूथ लेग्ज असे प्रकार असतील. त्वचेतील नरमपणा कायम ठेवण्यासाठी यात नैसर्गिक आक्रोड, पॅशन फ्रूट, रोझशिप, शिया बटर तसेच मोनोईचा उपयोग केला आहे. विशेष प्रकारची फुले खोबरेल तेलात बुडवून ठेवून मोनोई हे मिश्रण तयार होते. 28 जानेवारीपासून आसोस डॉट कॉमवर ऑ र्डर दिल्यानंतर ही जिन्स तुम्हाला घरपोच मिळू शकेल.

aughingsquid.com

Next Article

Recommended