आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आई झाल्यांनतर स्मरणशक्ती तेज होते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - महिला आई झाल्यांनतर तिची स्मरणशक्ती तेज होते, असा संशोधकांचा दावा आहे. साठवलेली माहिती आठवण्यात आई सक्षम असते, असे डेली मेलच्या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे. मुले झाल्यानंतर स्मरणशक्तीवर परिणाम होतो, असे महिलांनी समजण्याचे कारण नाही, असे मियामीच्या कार्लोस अलबिझू विद्यापीठातील संशोधक मेलिसा सॅन्टिगो यांनी म्हटले आहे.
स्मरणशक्तीच्या चाचणीमध्ये नव्याने माता झालेल्या महिला मुले नसलेल्यांच्या तुलनेत सरस ठरल्या आहेत. त्यांच्या आजूबाजूची माहिती आठवण्यात या महिला सक्षम असतात. मुले झाल्यानंतर स्मरणशक्तीवर परिणाम होतो, हा याआधीचा समज संशोधकांनी खोडून काढला आहे. पहिल्यांदाच माता झालेल्या व ज्यांची मुले 10 ते 24 महिन्यांची आहेत, अशा 35 माता व तेवढ्या मुले नसलेल्या महिलांच्या स्मरणशक्तीचा अभ्यास करण्यात आला. चाचणीत सहा चिन्हे असलेला कागद 10 सेकंद दाखवण्यात आला. त्यानंतर ही चिन्हे आठवून काढण्यास सांगितली होती. असा प्रयोग करण्यात आला. पहिल्यांदा दोन गटातील महिलांनी योग्य उत्तर दिले. मात्र, दुस-या आणि तिस-या वेळेस चिन्ह आठवण्यात माता सरस ठरल्याचे उघड झाले.