आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात नव्या संसदेची स्थापना; 66 वर्षांनी सत्तेचे लोकशाही सरकारमध्ये हस्तांतरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानात 66 वर्षांनंतर सत्तेचे रूपांतर लोकशाही संसदेत झाले. शनिवारी संसद सदस्यांचा शपथविधी झाला. नियोजित पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या हाती चौदा वर्षांनंतर देशाची सत्ता येणार असून त्यांनी नॅशनल असेंब्लीमध्ये आपल्या सहका-यांसह हजेरी लावली होती.


मावळत्या नॅशनल असेंब्लीच्या सभापती फहमिदा मिर्झा यांच्याकडून शरीफ व त्यांच्या सहका-यांना शपथ देण्यात आली. त्याअगोदर कडक सुरक्षा व्यवस्थेखाली नवीन संसद सदस्यांचे पहिले अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. पाकिस्तान मुस्लिम लीगचे प्रमुख शरीफ यांनी सकाळी लाहोरहून आपल्या काही खास सहका-यांसोबत रावळपिंडी असा प्रवास केला. त्यानंतर ते राजधानीकडे रवाना झाले. रेड झोनच्या सुरक्षेसाठी शेकडो जवान संसद परिसरात तैनात करण्यात आले होते. तेथून त्यांचा ताफा देशाच्या कनिष्ठ सभागृहाच्या अधिवेशनाकडे वळला. पांढा सलवार-कमीझ आणि भु-या रंगाचा वेस्टकोट परिधान केलेले 63 वर्षीय शरीफ नॅशनल असेंब्लीत पहिल्या रांगेत नेते चौधरी निसार अली खान यांच्यासमवेत बसले होते.


ड्रोन हल्ले सार्वभौमत्वाचे उल्लंघन : शरीफ
अमेरिकेचे ड्रोन हल्ले म्हणजे देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचा घणाघात पाकिस्तानचे भावी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केला. अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात तालिबानचा दुस-या क्रमांकाचा म्होरक्या वलीउर रेहमान मारला गेला होता. याअगोदर परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी अमेरिकी हल्ल्यांचे समर्थन केले होते.