आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cuba Releases New Pictures Of Ex leader Fidel Castro

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फिडेल कॅस्ट्रो यांचा फोटो ६ महिन्यांनंतर जगजाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हवाना - क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांची प्रकृती खालावल्याची अफवा पसरली होती. अफवेच्या सहा महिन्यांनंतर सरकारने त्यांचे पहिलेच छायाचित्र मंगळवारी जारी केले. त्यांच्या निवासस्थानाचे हे छायाचित्र आहे. ८८ वर्षीय कॅस्ट्रो पत्नी दालिया यांच्यासह आपल्या निवासस्थानी विद्यार्थ्यांसोबतच्या बैठकीत दिसून येत आहेत. सरकारी मालकीच्या "ग्रान्मा' वर्तमानपत्रात त्यांचे हे छायाचित्र प्रकाशित झाले आहे. अर्धशतकाचे शत्रुत्व सोडून अमेरिका आणि क्युबा यांनी एकत्र येण्याचा निर्णय गेल्या महिन्यात घेतला होता. त्यानुसार दोन्ही देश सामरिक पातळीवर आता मित्रराष्ट्र म्हणून परस्परांशी वागतील, असा ऐतिहासिक निर्णय झाला. त्यावर कॅस्ट्रो यांनी मौन बाळगले आहे. त्यानंतर सोशल मीडिया आणि परदेशील माध्यमातून कॅस्ट्रो आजारी असावेत किंवा त्यांचा मृत्यू झाला असावा, असा तर्क लावण्यात आला होता. सरकारी वृत्तपत्रात एक लेख लिहिण्यात आला आहे. २३ जानेवारी रोजी विद्यार्थी नेत्यासमवेत ही बैठक झाली.

८ जानेवारी रोजी सार्वजनिक दर्शन
कॅस्ट्रो यांचे सार्वजनिक जीवनातील शेवटचे दर्शन ८ जानेवारी २०१४ रोजी झाले होते. त्या वेळी त्यांनी एका कला दालनाला भेट दिली होती.