आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोप फ्रान्सिस आज पारंपरिक समारंभात पदभार स्वीकारणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हॅटिकन सिटी- कार्डिनल जॉर्ज मारिओ बर्गाग्लियो मंगळवारी पारंपरिक समारंभात पोप फ्रान्सिसच्या रूपाने पोप पदाची जबाबदारी स्वीकारतील.

या समारंभाला 132 देशांतील सरकारांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. त्यांच्याऐवजी मुस्लिम, बौद्ध, शीख, जैन धर्मांचे प्रतिनिधीही रोमन कॅथॅलिक धर्मगुरूच्या पदग्रहण समारंभाला उपस्थित राहतील. व्हॅटिकनकडून सोमवारी ही माहिती जाहीर करण्यात आली. त्यानुसार नवीन पोप मंगळवारी प्रतीक चिन्ह तसेच मच्छीमाराची अंगठी घालतील. या प्रतीक चिन्हात काही बदल करण्यात आलेले नाहीत. कार्डिनलच्या रूपाने त्यांचे जे सामान्य चिन्ह होते. त्यात व्हॅटिकनचे चिन्ह जोडण्यात आले.

बंदीनंतरही मुगाबे जाणार - झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे पोप यांच्या पदभार समारंभात सहभागी होण्यासाठी रोममध्ये पोहोचणार आहेत. त्यांच्यावर युरोपीय संघटनेने युरोपमध्ये प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे. मुगाबे (89) ख्रिश्चन आहेत. ते 2005 ते 2011 मध्ये व्हॅटिकनला आलेले आहेत.

आज का ?- मंगळवारी सेंट जोसेफ डे आहे. रोमन कॅथॅलिक समुदायात हा दिवस फादर्स डेच्या रूपाने साजरा केला जातो. पाश्चात्त्य ख्रिश्चन जगत याला फिस्ट ऑफ सेंट जोसेफ असे मानते. हा डे 40 दिवसांमध्ये येतो.