आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परिवर्तनाच्या मार्गावर चालेल व्हॅटिकन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जॉर्ज मारिओ बर्गोग्लिओ, ज्यांना आता पोप फ्रान्सिस नावाने ओळखले जाते. आपल्या अनुयायांपेक्षा पाद्र्यांचीच अधिक चिंता करणा-या चर्चला ग्रासणा-या आध्यात्मिक आजारासोबत त्यांनी सेंट पीटर यांच्या राजमुकुट धारण केला आहे. आतापर्यंत बदलांना नकार देणा-या या संस्थेत परिवर्तनाला सुरुवात झालीय हे त्यांच्या पहिल्यावहिल्या प्रबोधनाने स्पष्ट झालेच आहे.

रोमन कॅथॉलिक चर्चच्या साम्राज्याने आतापर्यंत जितक्या आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला आहे, तितका सामना इतिहासात कदाचित दुस-या कोणत्याही साम्राज्याला करावा लागला नसेल. प्रत्येक नवीन पोपसमोर नवी आव्हाने असतात आणि 21 व्या शतकात 1.2 अब्ज लोकांशी निगडित आध्यात्मिक साम्राज्याच्या उच्च पदावर विराजमान पोप फ्रान्सिसही याला अपवाद नाहीत. परंतु त्यांच्या पुढे काही जुनी आव्हानेही आहेत. पाद्र्यांनी केलेले मुलांचे लैंगिक शोषण आणि याच्याशी निगडित प्रकरणात चर्चच्या अपयशासंबंधी प्रश्नांना त्यांना उत्तर द्यावेच लागेल. त्यांना व्हॅटिकनच्या वित्तीय व्यवस्थेतही सुधारणा करावीच लागेल. त्यांना दोन वेगवेगळ्या ध्रुवांच्या एकमेकांपेक्षा भिन्न मागण्यांमध्ये ताळमेळ साधावाच लागेल. उत्तर अमेरिका आणि युरोपातील कॅथॉलिक संप्रदाय चर्चची विचारधारा उदारवादी असावी याचे समर्थक आहेत, तर आशिया आणि आफ्रिकेत रूढीवादी स्वरूपाचे समर्थक अधिक प्रमाणावर आहेत. त्यांचे पूर्वाधिकारी बेनेडिक्ट सोळावे यांची उपस्थितीही एक वेगळीच अडचण आहे. ते भलेही निवृत्त झाले असोत; परंतु त्यांची उपस्थिती चर्चच्या रूढीवादी वारशाचे प्रतिनिधित्व करते.

जोसेफ रेटजिंगर यांच्या सोळावे बेनेडिक्ट पदाच्या निवडणुकीमध्ये त्यांचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी म्हणून बर्गोग्लिओ यांचे नाव चर्चिले गेल्यावर आठ वर्षांपूर्वीच ते इतिहास रचण्याच्या जवळ पोहोचले होते. पॅपल कॉन्क्लेव्हपूर्वी फेव्हरेट आणि डार्क हॉर्स उमेदवारांची कमतरता नव्हती आणि बर्गोग्लिओंचा समावेश या दोघांमध्येही होता. मिलानच्या कार्डिनलला बेनेडिक्ट सोळावे यांचे उत्तराधिकारी मानले जात होते कारण कदाचित याचमुळे बेनेडिक्ट यांनी त्यांना झटपट बढती दिली होती. तर, साओ पावलोच्या कार्डिनलला नोकरशहांची पसंती होती. अर्जेंटिनातील एका दुस-या कार्डिनललाही बर्गोग्लियोपेक्षा जास्त पाठिंबा मिळाला होता. बर्गोग्लियोकडे कुणाचेही लक्ष नव्हते. कारण, त्यांचे 76 वर्षांचे वय अधिक मानले जात होते आणि दुसरे कारण म्हणजे ते जेस्यूटचे सदस्य होते. आतापर्यंत कोणताही जेस्यूट पोप झालेला नाही. परंतु, 2005 च्या मतदानात ते रेटजिंगर यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले गेले होते. त्यांना नेहमीच कार्डिनल्सचा पाठिंबा असल्याचे सांगितले जाते आणि हे सत्य आहे. निवडणुकीपूर्वी दोन मोठे गट ठळकपणे दिसून येत होते. एक व्हॅटिकनच्या नोकरशहांचा क्यूरिया हा समर्थकांचा गट होता. हा गट इटालियन विचारधारेचा समर्थक होता आणि ब्राझीलचे कार्डिनल ओडिलो शेरर यांना पाठिंबा देत होता. दुसरा गट त्या लोकांचा होता ज्यांना चर्चच्या अडचणींची वास्तविक जाणीव होती. यात अमेरिका आणि त्याच्या सहका-यांच्या कार्डिनलचा समावेश होता. हे लोक मिलानचे कार्डिनल एंजेलो स्कोलाचे समर्थक होते. क्युरियाला मात्र ते आवडत नसत. परंतु ते मुळात इटलीचे आहेत आणि स्थानिक राजकारणात मार्ग कसा काढावा, याची त्यांना चांगलीच माहिती आहे. बर्गोग्लिओ या सा-यांमध्ये सर्वमान्य उमेदवार म्हणून समोर आले. ते व्हॅटिकनच्या रूढिवादी विचारांपासून फार दूर जाऊ शकणार नाहीत. परंतु चर्च प्रशासनात त्यांच्या प्रयोगवादी वृत्तीची झलक दिसू शकते. ते आध्यात्मिक आजारांचे बळी ठरलेल्या आणि आपल्याच तंद्रीत असलेल्या चर्चचे समर्थक नाहीत. ते कॅथॉलिक साम्राज्यात नवीन ऊर्जा भरतील. त्यांच्या निवडीने लॅटिन अमेरिकी देशांमध्ये नवीन ऊर्जा संचारेल.