आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Research : Apps Who Helping To Give Up Smoking

नवे संशोधन: धूम्रपान सोडण्यासाठी मदत करणारे अँप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - धूम्रपानाची सवय सोडण्याचा प्रयत्न करणार्‍यांसाठी ही खुशखबर आहे. त्यांना अँपच्या मदतीने ही सवय सोडता येऊ शकेल, असा दावा संशोधकांनी केला आहे.
अमेरिकेतील धूम्रपानाची सवय असलेल्या 1 कोटी 10 लाख नागरिकांचा अभ्यास या प्रकल्पात करण्यात आला. विकसित करण्यात आलेले हे अँप एक कोटीहून अधिक नागरिकांनी डाऊनलोड करून घेतले आहे. हे अँप युजरला सहजपणे समुपदेशनाचे काम करते. त्याचबरोबर धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी लागणार्‍या टिप्सदेखील उपलब्ध करून देते. जागतिक पातळीवर आतापर्यंत दर महिन्याला 7 लाखांहून अधिक युजरनी हे अँप डाऊनलोड करण्यास सुरुवात केली आहे. लोकांच्या मदतीसाठी संशोधक व तंत्रज्ञांनी अँपच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे, अशी माहिती प्रमुख संशोधक लॉरिन सी. अब्रॉम्स यांनी दिली. संशोधकांनी आयफोनवरील 47 व अँड्रॉइडच्या 51 ऑपरेटिंग सिस्टिमचा अभ्यास केला. त्यातून युजरला योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.