आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिवंतपणीच मृत्यूच्या दारातून परतीची अनुभूती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - मृत्यूच्या क्षणी ऊर्जेचा महाप्रपात डोळ्यासमोर चमकतो आणि जीव त्यामध्ये विलीन होऊन जातो. त्या क्षणाला मेंदूमधील ऊर्जेचे तरंग नेहमीपेक्षा अधिक गतिमान असतात. त्यामुळे मेंदूतील हालचाली वाढलेल्या असतात. त्यामुळे जीवंतपणीच मृत्यूची अनुभूती घेता येऊ शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे.

मृत्यूचे गूढ शोधून काढताना संशोधकांनी उंदरांवर प्रयोग केला. नऊ उंदरांच्या मृत्यूचा प्रवास समजून घेण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला. मृत्यूच्या जवळ असताना उंदराच्या मेंदूमध्ये वेगवान हालचाली झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या हृदयाची क्रिया बंद पडली. त्यानंतर 30 सेकंद मेंदूमध्ये ऊर्जेच्या वेगवान हालचाली झाल्याचे दिसून आले.

मेंदूची कार्यप्रणाली बंद होताना काय होते, हे जाणून घेण्याचीदेखील संशोधकांना उत्सुकता होती. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. बेशुद्धावस्थेत व्यक्तीची स्थिती नेमकी कशी असते याचा अंदाज त्यावरून बांधता येऊ शकतो.