आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजव्यापेक्षा डावेच बरे; इतरांच्या तुलनेत डावखुरा कुत्रा आक्रमक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - डाव्या पंजाने अनोळखी व्यक्तीवर हल्ला करणारा कुत्रा जास्त आक्रमक असतो, असा दावा नव्या अभ्यासात करण्यात आला आहे. संशोधकांनी 75 श्वानांच्या वर्तणुकीचा अभ्यास केला. अनोळखी व्यक्तीवर धाव घेण्यासाठी डाव्या पंजाचा वापर करणारे श्वान उजव्या पंजाचा वापर करणार्‍या श्वानापेक्षा अधिक आक्रमक असतात, असे आढळून आले आहे.

डाव्या पंजाचा वापर आणि आक्रमकता अभ्यासण्यात आली असली तरी त्याचा कुत्र्यांच्या उत्तेजनेशी वा लक्ष वेधण्याच्या कृतीशी संबंध नाही. डावा पंजा वापरणार्‍या अन्य प्राण्यांबाबत माहिती नसल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. डावा पंजा मेंदूच्या उजव्या भागाकडून नियंत्रित केला जातो. याचा नकारात्मक भावनांशी संबंध आहे. माणसाच्या या विषयावर केलेल्या संशोधनात असेच निष्कर्ष आढळून आले होते, असे अँडलेड विद्यापीठातील डॉ. ल्यूक स्केनेडर यांनी सांगितले.