आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या सॉफ्टवेअरच्या मदतीने ब्रम्हांडाच्या तुकड्याची निर्मिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- एका नव्या सॉफ्टवेअरच्या मदतीने शास्त्रज्ञांनी ब्रम्हांडाच्या तुकड्याची हुबेहूब निर्मिती केली आहे. अब्जावधी वर्षांपूर्वी हजारो आकाशगंगांची निर्मिती आणि विकास कसा झाला त्याची अचूक माहितीही या सॉफ्टवेअरद्वारे मिळते.
हॉर्वर्ड- स्मिथसोनियन खगोलविज्ञान केंद्र (सीएफए) आणि हिडनबर्ग इन्स्टिट्यूट ऑ थिअरॅटिकल स्टडीजच्या (एचआयटीएस) शास्त्रज्ञांनी मिळून अरेपो नावाचे हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्याच्या साहाय्याने अभूतपूर्व रेझ्यूलेशनमध्ये ब्रांडाच्या एका मोठय़ा भागाची हुबेहूब निर्मिती करता येते. त्यामुळे ब्रांडाचे सर्वात मोठे आणि वस्तुनिष्ठ मॉडेल तयार करता येणे शक्य झाले आहे. यापूर्वी या रेझ्यूलेशनमध्ये ब्रांडाचे वस्तुनिष्ठ प्रतिमान तयार करण्यात आले नव्हते. 14 अब्ज वर्षांपूर्वी झालेल्या बिगबँग महास्फोटानंतर ब्रम्हांडाची निर्मिती आणि विकास कसा झाला त्याची परिपूर्ण प्रतिकृती या सॉफ्टवेअरच्या मदतीने करण्यात आली आहे. स्थानिक ब्रम्हांडात दिसणार्‍या आकाशगंगांची आम्ही निर्मिती केली आहे, असे सीएफएचे मार्क व्होगेलस्बर्गर यांनी म्हटले आहे. हॉर्वर्डच्या ऑडिसी या सुपर कॉम्प्युटरवर ब्रम्हांड निर्मितीची हुबेहूब नक्कल करण्यात आली.