आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Syllabus Appose In American School News In Divya Marathi

अमेरिकेमध्ये नवीन शालेय कोर्सला विरोध..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षणाच्या बाबतीत अमेरिकेतील शाळकरी विद्यार्थी इतर देशांच्या तुलनेत कितीतरी मागे चालत आहेत. हे तथ्य लक्षात घेऊन 2010 मध्ये राष्ट्रीय गव्हर्नर्स असोसिएशन व शिक्षणतज्ज्ञांनी एक नवीन प्रकारचा कोर्स तयार केला. विद्यार्थ्यांचे करिअर सुधारणे आणि त्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी तयार करण्याच्या उद्देशाने कॉमन कोअर टेस्ट तयार केली. त्यात इंग्रजी, गणित यांवर अधिक लक्ष पुरवण्यात आले. 45 राज्ये तत्काळ कोर्स लागू करण्यासाठी तयार झाली. शिक्षणाधिकार्‍यांना अपेक्षा होती की, नव्या अभ्यासक्रमाने स्तर सुधारेल. मात्र लवकरच विरोधाचे वारे वाहू लागले.

संपूर्ण न्यूयॉर्क राज्यात एका नव्या कोर्सला विरोध सुरू झाला. पालकांचे म्हणणे आहे की, नवा कार्यक्रम सदोष आहे. न्यूयॉर्कमध्ये हजारो विद्यार्थी अनिवार्य इंग्रजी चाचणीपासून वेगळे करण्यात आले. रेल्ला जिल्ह्याात 60 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही. रॉकव्हिले केंद्रात 45 टक्के विद्यार्थी परीक्षेला नाही बसले. मार्चमध्ये परीक्षा संपवणारे इंडियाना पहिले राज्य बनले. एक डझन इतर राज्यांमध्ये कार्यक्रमाच्या समीक्षेवर विचार करण्यात येत आहे.

राजकीय विरोधही सुरू आहे. टी पार्टी गटाने कॉमन कोअरला केंद्रातर्फे शिक्षणाचे अधिग्रहण म्हटले आहे. शिक्षक संघटना व काही संस्थांनी आघाडी उघडली आहे.