आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञानाने शाळांमध्ये वाचण्या-लिहिण्याची पद्धत बदलली...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. पीबीएस लर्निंग मीडियाच्या सर्वेक्षणानुसार सुमारे तीन-चतुर्थांश अमेरिकन शिक्षक विद्यार्थ्यांना प्रेरित करणे आणि शिकवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतात. अशा वातावरणात विद्यार्थीदेखील पुढे आले आहेत. उदाहरणार्थ- न्यूयॉर्कच्या नेनुएट शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिनी रेस कार बनवल्या आहेत. शाळेचे थ्रीडी प्रिंटर आणि इतर डिव्हाइसनी खरीखुरीसारखी कार बनवली आहे. नव्या तंत्रज्ञान वापराने विद्यार्थी अधिक स्मार्ट आणि क्रिएटिव्ह बनतात. भविष्यातील वर्गाला आकार देणार्‍या नव्या तंत्रज्ञानावर एक नजर...

थ्रीडी प्रिंटर- मेकरबॉट कंपनीने अमेरिकन शाळांमध्ये पाच हजार थ्रीडी प्रिंटर लावले आहेत. त्यातून विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र शिकण्यास मदत होते.

टच स्क्रीन चॉकबोर्ड-ह्युलेट पेकार्ड कंपनी ताइपेच्या वर्गात याचे परीक्षण करत आहे. टच स्क्रीन विद्यार्थ्यांच्या संगणकाला जोडण्यात आले आहे. त्यातून ते टिपणे आणि मल्टिमीडिया पाहू शकतात.
सेलफोन- केटी, टेक्सासच्या शाळांमध्ये मुलांना आपला स्मार्टफोन आणायला सांगितले आहे. त्यांना फोनने रिसर्च करता यावे, प्रश्नांची उत्तरे देता यावीत.

टॉयशी मेळ- किकस्टार्टरने गोळा केलेल्या पैशांनी निर्मित इम्पेथी टॉय जगभरातील ४०० शाळांत प्रयोग केले जात आहेत.