आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत एड्सचा समूळ नायनाट करणा-या लसीचा शोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - शरीरातील एचआयव्हीला बाहेर काढणा-या लसीची निर्मिती करण्यात संशोधकांना यश आले आहे. ऑरेगॉन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी हा दावा केला आहे. या लसीची लवकरच मानवावर चाचणी केली जाणार आहे. विशिष्ट रोग प्रतिकारशक्तीकडून आलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे संशोधकांना एचआयव्हीसारख्या रोगावर मात करण्यासाठी दिशा मिळाली आहे. माकडावर यासंबंधी झालेल्या प्रयोगात ही लस अतिशय चांगल्या प्रकारे संघर्ष करू शकते, असे दिसून आले आहे. लसीचे परीक्षण माकडातील विषाणू एसआयव्हीवर केले जात आहे.

लस घेतल्यानंतर 50 टक्के मांकडातील एसआयव्हीला संक्रमित करण्यात आले. त्याच्याशी संघर्ष करणा-या विकसित एसआयव्ही स्पेसिफिक टिसेल्सने काही दिवसानंतर शरीरातील एसआयव्हीला नष्ट केले. दरम्यान, जगातील एचआयव्ही बाधितांपैकी केवळ दोन जणांनाच आतापर्यंत बरे करण्यात आल्याची प्रकरणे आहेत. टिमोथी ब्राउन यांना 1995 मध्ये एचआयव्ही झाला होता. नंतर त्यांना कर्करोग झाला. मूळपेशींचे प्रत्यारोपण झाल्यानंतर त्यांची प्रतिकारशक्ती वाढली. 2012 मध्ये झालेल्या चाचणीत त्यांना एड्समुक्त घोषित करण्यात आले. 2013 मध्ये अमेरिकेच्या मिसिसिपी येथील औषधीच्या कॉकटेलमधून एका मुलीला बरे करण्यात आले होते.