आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये प्रथमच मदर्स ओन्ली !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क: जगप्रसिद्ध न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये प्रथमच बिझी मदर्सला डोळ्यासमोर ठेवून डिझाइन्सचे सादरीकरण करण्यात येणार आहे. आगामी शोमध्ये आधुनिक स्त्रीने आई म्हणून वावरताना कोणत्या वस्त्र प्रावरणास प्राधान्य द्यावे, ही गोष्ट मॉडेल कॅटवॉक करताना पाहायला मिळणार आहे.
फॅशन जगतात न्यूयॉर्क फॅशन वीकचे महत्त्व काही वेगळेच आहे. या शो-मध्ये बिझी मदर्सना समोर ठेवून कपडे सादर करण्यासाठी काही मदर्सना पाचारण करण्यात येणार आहे. आई असलेल्या अनेक फॅशनेबल मॉडेल शोमध्ये आपला जलवा दाखवतील. आई म्हणून वावरताना कपडे हे किड्स-फ्रेंडली असावेत. ते घरातून कार्यालयाच्या ठिकाणी सहजपणे नेता यावेत, अशा काही कपड्यांचे ट्रेंडही दिसतील, असे वुमेन्स विअर डेलीने म्हटले आहे.
आईपण आणि फॅशन
फॅशन आणि आईपण या गोष्टी अंतर्गत पातळीवर एकमेकांशी खूपच जवळच्या असल्या तरी या दोन्हींचे संतुलन राखणे हे वाटते तितके सोपे नाही, असे मत लिंकन फॅशन सेंटरच्या संचालिका स्टीफनी विन्स्टन यांनी सांगितले. आई म्हणून असलेल्या जबाबदाºया पार पाडताना फॅशनकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे रोजच्या जीवनात किड्स फ्रेंडली कपड्यांचा अभाव दिसून येतो. ही बाब बिझी मदर्ससाठी योग्य नाही.