आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New York Roommates Find 40000 Dollars Inside Couch News In Marathi

सेकंडहॅंड सोफ्यातून निघाल्या नोटाच नोटा, कॉलेज स्टूडंसचे डोळे झाले पांढरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्युयॉर्क- तुम्ही तुमच्या घरी नेहमीच सोफ्याची साफसफाई करीत असाल. यावेळी सोफ्याच्या फटींमध्ये आणि खाली पेन, सुटे पैसे आणि इतर हरवलेल्या वस्तू नक्किच सापडत असतील. पण कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांना जे काही सापडले त्यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही... विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातील सोफ्याची साफसफाई करत असताना चक्क 41,000 डॉलरच्या कोऱ्या करकरीत नोटा सापडल्या. या नोटा बघून विद्यार्थ्यांचे डोळेच पांढरे झाले.

न्युयॉर्क येथील रहिवासी आणि कॉलेज स्टुडंट रिस रेकहॉवेन आणि त्यांच्या दोन मैत्रिणी कॅली गुओस्टी आणि लारा रुसो यांनी एक सेकंडहॅंड सोफा घरी आणला. 20 डॉलर खर्च करून त्यांनी हा सोफा आणला होता. त्याच्यावर खुप धुळ बसली होती. त्यामुळे रिसने त्याची साफसफाई करण्याचा विचार केला. परंतु, त्याने साफसफाई करण्यास जशी सुरवात केली त्याच्या हाती एक लिफाफा आला.
पुढील स्लाईडवर वाचा एका विधवा महिलेची आयुष्यभराची कमाई ठेवली होती सोफ्यात....