आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Zealand Jihadist Mistake Revealed Location In Syria

ISISच्या जिहादीची \'घोडचूक\'; सोशल मीडियावर जगजाहीर झाले सीरियातील \'लोकेशन\'!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: मार्क टेलर आणि सोबत त्याचे सीरियातील लोकेशन)

रक्का- इस्लामिक स्टेट अर्थात ISISला पाठिंबा देणार्‍या न्यूझिलंडच्या एका जिहादीच्या हातून मोठी चूक झाली आहे. सीरिया विरुद्ध युद्धादरम्यानची काही ठिकाणे त्याने सोशल मीडियावर अपडेट केली आहेत. मार्क टेलर उर्फ अबु अब्दुल रहेमान असे त्याचे नाव असून तो न्यूझिलंडचा रहिवासी आहे.
मार्क टेलर याने नुकताच इस्लाम धर्म स्विकारला असून तो सीरियातील इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी झाला आहे. मार्क 'टि्वटर'च्या माध्यमातून आपल्या फॉलोअर्सला युद्धाची अपडेट माहिती देत होता. मात्र, असे करताना मार्क टेलरच्या मोबाइलचे जिओ लोकेशन फीचर ऑन होते. टेलरने याने स्वत:च्या 'टि्वटर' अकाउंटवरून 45 ट्वीट केले होते. त्यात टेलर सीरियामध्ये गेलेल्या प्रत्येक ठिकाणाचे 'लोकेशन' जगजाहीर झाले होते. कॅनडाचा सोशल मीडिया जिहाद मॉनिटर 'इब्राबो'ने सर्व ट्‍वीट सेव्ह केले आहे. मार्क टेलर याचे 'टि्वटर'वर कीव्ही जिहादी नामावाने अकाउंट आहे.
चूक लक्षात येताच सर्व 'ट्वीट' केल्या डिलिट...
मार्क टेलर याला आपली चूक लक्षात येतात त्याने पोस्ट केलेल्या सर्व ट्वीट डिलिट केल्या आहेत. लोकेशन जगजाहीर झाल्याने गुप्तचर संस्थांना याची माहिती मिळाली असल्याची भीती मार्क टेलरला आहे.
इब्राबोच्या मते, टेलरच्या आधीही अनेक जिहादींनी चुकीमुळे त्यांचे लोकेशन जगजाहीर झाले होते. कॅनडा, फ्रान्स आणि पश्चिमात्य देशातील जिहादींनी चुकून स्वत:चे लोकेशन जाहीर केले होते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, मार्क टेलरद्वारा जगजाहीर केलेल्या सीरियातील ISIS चे लोकेशन