इंटरनॅशनल डेस्क - युनिस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश असलेल्या ठिकाणांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे, असे मानण्यात येते. काही दिवसांपूर्वी युनिस्कोच्या पथकांने जगभरातील एक हजार ठिकाणांचा दौरा केला. त्यानंतर काही नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसांची प्रतिष्ठित अशा संरक्षण यादीत समावेश करण्यात आले आहे. तत्पूर्वी युनिस्कोची कतार येथे वर्ल्ड हेरिटेज कमीटिची बैठक पार पडली.
युनिस्कोने 1978 नंतर जागतिक वारसा यादीत महत्त्वाच्या स्थळांचा समावेश करण्यास सुरूवात केली. नव्या जागतिक वारसा यादीत 3 हजार 700 इ.स.पू. लुईसियाना संस्कृतीची अवशेषापासून म्यानमारचे प्राचीन शहर प्यू , डेन्मार्कची स्टीव्हन्स क्लिंट पर्वतरांगा जी डायनोसॉर युगाची साक्षी देतात आणि भारतामधील गुजरात राज्यातील राणीची वाव यांना स्थान देण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा युनिस्कोने जाहीर केलेली जागतिक वारसा स्थळे.....