आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इबोलामुळे हादरले अवघे जग, जीवघेण्या विषाणूमुळे भविष्यातील घटनांचा गर्भित इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इबोला या जीवघेण्या आजारामुळे पश्चिम आफ्रिकेत गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. इबोला विषाणूने आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला आहे. परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूटीओ) इबोला संसर्गाला आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय म्हणून आणीबाणी घोषित केले आहे. अनेक देशांमध्ये ‘इबोला अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

मध्य लायबेरियात फेबे रुग्णालय चालवणारे डॉ. जेफरसन सिबली कडव्या आव्हानाला तोंड देत आहेत. लायबेरियासोबतच सिएरा लिओन, गिनीमध्ये आजाराचा प्रकोप सर्वाधिक आहे. जुलैत फेबे रुग्णालयात इबोलाच्या एका रुग्णावर उपचार झाला होता. त्यातून रुग्णालयातील पाच परिचारिका, एक सहायक आणि एका डॉक्टरला विषाणूचा संसर्ग झाला. सर्व परिचारिका आणि सहायकाचा मृत्यू झाला. डॉक्टर वाचले. परिचारिकांना लायबेरियाची राजधानी मोनरोव्हियाच्या आयसोलेशन सेंटरमध्ये नेल्यानंतर रुग्णालयाच्या 200 कर्मचार्‍यांनी कामावर येणे बंद केले. त्यांचे म्हणणे आहे, शरीरातील रक्त आणि इतर द्रव पदार्थांच्या निकट संपर्काने पसरणार्‍या आजारापासून बचाव होण्याची साधने पुरवल्यानंतरच ते कामावर परततील.

पश्चिम आफ्रिकेत आजाराने आतापर्यंत 80 आरोग्य कर्मचार्‍यांनी जीव गमावला. रुग्णालये बंद होत आहेत. मोनरोव्हियात रस्त्यावर प्रेते कुजत पडली आहेत. सरकारने संसर्ग झालेल्या क्षेत्राची नाकाबंदी केली आहे. लोकांना बाहेर जाण्यास बंदी आहे. आपल्या रिकामी रुग्णालयासमोर उभे डॉ. सिबली सांगतात, युद्धात तुम्हाला स्फोटांचे आवाज ऐकू येतात. तुम्ही वाचू शकतात. इबोला असा नाहीये. तुम्हा कळणारही नाही तो कुठून येईल, कोण त्याला आणत आहे?

पश्चिम आफ्रिकेत हैदोस घालणारा इबोला हा अमेरिकेसह इतर विकसित देशांमध्ये पसरण्याची गंभीर समस्या नाही, तरी अमेरिकेच्या आरोग्य नियंत्रण केंद्राचे (सीडीसी) अटलांटातील मुख्य कार्यालय सतर्क आहे. जगातील कोणत्याही भागातील नियंत्रण सुटलेले संक्रमण उर्वरित जगासाठी धोका निर्माण करू शकते. सीडीसीचे संचालक डॉ. टॉम फ्रिडेन सांगतात की, आम्ही अशा जगात राहतो की जिथे हवा, पाणी आणि अन्न अशा विविध माध्यमांतून लोक एकमेकांशी जोडलेले असतात. विमानांद्वारे दिवसभरात आजार कुठेही पोहोचू शकतात. त्यामुळे जागतिक आरोग्य सुरक्षा मजबूत होणे गरजेचे आहे. इबोलावर प्रभावी उपचार नसल्यामुळे माणसाची हतबलता उघड होते. त्यावर लस उपलब्ध नाही. एखाद्या जीवघेण्या महामारीला तोंड देण्यास आपल्याकडे पर्याय तोकडे आहेत. 2009 मध्ये एच-1 एन-1 फ्ल्यूची लस वेळेवर तयार होऊ शकली नव्हती. सीडीसेचे फ्रिडेन म्हणतात, अमेरिकन आरोग्य सेवा उद्योगात आतासुद्धा अशाच क्षमतेचा अभाव आह, जे गंभीर आजारांवर उपचार करू शकत नाही. मिनेसोटा विद्यापीठातील संसर्गजन्य आजार संशोधन केंद्राचे संचालक मायकेल ओस्टरहोम यांचे म्हणणे आहे की, जर उद्या फ्लूसारखी महामारी पसरली तर अमेरिकन हेल्थ केअर सिस्टिमची वाईट स्थिती उघडी पडेल. हा इबोलाचा महत्त्वाचा धडा आहे. एकमेकांशी जोडलेल्या जगात अतिशय मजबूत समजली जाणारी मेडिकल सिस्टिमसुद्धा इतकी दुबळी सिद्ध झाली आहे.

इबोलाच्या हल्ल्याने आफ्रिकेत खळबळ माजवली आहे, परंतु दोन अमेरिकन आरोग्य कर्मचार्‍यांच्या शिकारीमुळे अमेरिकेचे लक्ष तिकडे वेधले गेले आहे. डॉ. केन्ट ब्रेंटली आणि नेन्सी राइटबोल लायबेरियाच्या एका रुग्णालयात इबोलाग्रस्तांवर उपचार करत असताना या विषाणूला बळी पडले. दोघांना अटलांटामध्ये एमरॉय विद्यापीठाच्या रुग्णालयात आणले आहे.

जनावरांमध्ये सतर्कता
संशोधनातून संकेत मिळतात की, गिनीच्या गुएकेदाऊजवळ गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इबोलाने पहिला मृत्यू दोन वर्षांच्या बालकाचा झाला होता. हे शहर सिएरा लिओन, लायबेरिया यांच्या सीमेजवळ आहे. बर्ड फ्ल्यू आणि सार्ससारख्या रोगजंतूचा इबोला एका जंतूने पसरणारा आजार आहे. हा अगोदर प्राण्यांमध्ये पसरतो नंतर तो माणसाला निषाणा बनवितो. संशोधकांना विश्वास आहे की, वटवाघळाच्या (फ्रूटबॅट) काही प्रजाती एबोला विषाणूच्या वाहक असू शकतात. आफ्रिकेच्या ग्रामीण भागात वन्य वटवाघळे व माकडाचे मांस खाल्ले जाते. संसर्ग झालेल्या प्राण्याचे मांस खाल्ल्याने इबोला विषाणू मानवात फैलावण्याची शक्यता आहे. मध्य आफ्रिकेत एचआयव्ही विषाणू चिंपाझीमधून मानवात पसरला होता. दक्षिण चीनमध्ये वटवाघूळ (हॉर्स शू बॅट) च्या एका प्रजातीमधून मानवामध्ये सार्स आजार पसरला होता.

संक्रामक जग
आफ्रिकेत गेल्या काही दशकांमध्ये लोकसंख्येचा विस्फोट झाला आहे. या खंडाची लोकसंख्या या घडीला 1 अब्ज 10 कोटी आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार शतकाअखेर पृथ्वीच्या लोकसंख्येत आफ्रिकन लोकांची संख्या 40 टक्के असेल. आफ्रिकन लोकांचे येणे-जाणे वाढत आहे. तुलाने विद्यापीठात एबोला संशोधनाशी निगडित विषाणूतज्ज्ञ रॉबर्ट गॅरी सांगतात. इबोलाचे संक्रमण मध्य आफ्रिकेत होत असे. पश्चिम आफ्रिकेतील गावे जवळ जवळ असल्याने आजार पसरतो. आणखी एक अडचण आहे की, लायबेरिया, सिएरा लिओन यांसारख्या गरीब देशांमध्ये आरोग्य सेवा आजारांशी दोन हात करण्यात सक्षम नाहीत. यादरम्यान, जागतिक बँकेने 20 कोटी डॉलरची मदत देण्याची घोषणा केली आहे. स्थानिक लोकांमध्ये आजाराच्या दहशतीने नियंत्रण डळमळीत केले आहे. लोक आजारी नातेवाइकांना लपवून ठेवतात. आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ले करतात.

काही उपायच नाही
इबोलावर उपचार नाहीत. डॉक्टर फक्त रुग्णाचा त्रास कमी करू शकतात. त्याला ऑक्सिजन, रक्त आणि द्रव पदार्थांच्या पुरवठ्याद्वारे जिवंत ठेवले जाऊ शकते. खरे तर आता स्थिती बदलत आहे. इबोलाच्या दोन अमेरिकन रुग्णांचा उपचार प्रायोगिक औषध, झेडमॅपने केला आहे. सॅनदिएगो येथील 11 वर्षे जुनी कंपनी मॅप बायोफार्मास्युटिकलने औषध बनविले आहे. झेडमॅपच्या प्रभावी होण्याचे पुरावे मिळाले तर नाहीत, परंतु त्याने अमेरिकन रुग्णांच्या स्थितीत सुधारणा झाली आहे. इबोलापीडित आफ्रिकन देशांनी औषधांची मागणी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने इबोलाशी लढण्यासाठी औषधाच्या वापराची शिफारस केली आहे. मॅप बायोफार्माने औषधांच्या काही मात्रा एका पश्चिम आफ्रिकन देशाला पाठवल्या आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, झेडमॅपचा स्टॉक संपला आहे. काही इतर लसीही आहेत; परंतु मागणी नसल्यामुळे त्या थंड बस्त्यात पडल्या आहेत.

रेडं अलर्ट
जागतिक आरोग्य संघटनेने इबोलाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. 2005 नंतर अशी तिसरी घोषणा आहे.
- मुख्यत्वे पश्चिम आफ्रिकेतील तीन देश - गिनी, लायबेरिया, सिएरालिओन सर्वाधिक विळख्यात आहेत.
- विषाणूंचे संक्रमण रुग्णाचे रक्त, शरीराचे इतर द्रव पदार्थ संपर्कात आल्याने होते.
- इबोला विषाणूसंक्रमित प्राण्याचे मांस खाल्याने माणसांमध्ये पसरतो. इबोलाग्रस्त रुग्णाला भयानक आणि वेदनादायी मृत्यूचा सामना करावा लागतो. काही रुग्णांचा खूप सारे रक्त वाहून गेल्यामुळे मृत्यू होतो.
- अमेरिकेचा इमर्जिंग पँडेमिक थ्रीट्स् (इपीटी) प्रोग्राम पश्चिम, मध्य आफ्रिका आणि नैर्ऋत्य (दक्षिण पूर्व) अशियात इबोलाच्या जीवघेण्या विषाणूबद्दल जागरूकता करणार्‍या संशोधकांची मदत करत आहेत.