आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1300 वर्षापूर्वीच्‍या बुद्ध विहारात आजही नाकारला जातो महिलांना प्रवेश, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभर स्त्री-पुरूष समानतेच्या केवळ गप्पा मारल्‍या जात आहेत. मात्र ख-या आर्थाने आजही स्‍त्री-पुरूष समानता आलेली नाही. याचे हे जिवंत उदाहरण म्‍हणावे लागले. 1300 वर्षापूर्वीच्‍या जपानच्‍या एका विहारामध्‍ये आजही स्‍त्रीयांना प्रवेश नाकारला जातो.
तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करणा-या जपानमधील नागरिक आजही पारंपरीक पद्धतीचे अनुकरण करत असल्‍याचे चित्र स्‍पष्‍ट दिसत आहे. जपानच्‍या दुर्गम भागातील 'माऊंट ओमिनी' नावाच्‍या बुद्धिस्‍ट विहारात आजही महिलांना प्रवेश दिला जात नाही. विहाराच्‍या प्रवेशद्वारावर 'महिलांना प्रवेश निषिद्ध' अशा प्रकारचा बोर्ड लावण्‍यात आला आहे. याविरोधात जपानच्‍या महिला संघटनांनी आवाज उठवला. मात्र धार्मिक परंपराच्‍या नावाखाली महिला संघटनेची मागणी धुडकावून लावण्‍यात आली. जपानच्‍या सर्वात सुदंर पर्यटनस्‍थळांपैकी या विहाराला ओळखले जाते. महिलांना मात्र या पर्यटन स्‍थळाचा आनंद घेता येत नाही.
बुद्ध विहाराची छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...